फेसबुकवर 'गुडबाय' करून विद्यार्थ्याची आत्महत्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

कोलकता- सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवर एका विद्यार्थ्याने 'गुडबाय' पोस्ट अपलोड केल्यानंतर गळफास घेतल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.

कोलकता- सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवर एका विद्यार्थ्याने 'गुडबाय' पोस्ट अपलोड केल्यानंतर गळफास घेतल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समप्रित बॅनर्जी हा येथील एका शाळेत अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. अभ्यासात त्याची चांगली प्रगती होत नव्हती. यामुळे आई-वडिलांनी त्यांची शिक्षकांकडे तक्रार केली होती. वर्गातही शिक्षकांनी त्याला कमी गुण मिळाल्यामुळे उभे केले होते. शिवाय, अनेकदा टोमणेही मारले होते. यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो दडपणाखाली वावरत होता. बुधवारी (ता. 18) रात्री त्याने फेसबुकवर 'गुडबाय' पोस्ट अपलोड केल्यानंतर पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, समप्रितला फोटोग्राफी व गिटार वाजविण्याची आवड होती. परंतु, अभ्यासात कमी गुण मिळत असल्यामुळे कुटुंबियांसह शिक्षकही त्याच्यावर नाराज होते.

Web Title: Boy posts 'bye' on Facebook, found hanging