
उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका ४५ वर्षीय पुरूषाने त्याच्या ६५ वर्षीय प्रेयसीचा गळा दाबून खून केला. कारण प्रेयसीने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. हे प्रकरण सराई अकिल पोलीस स्टेशन परिसरातील बराई गावचे आहे.