esakal | ‘ब्राह्मोस’चे भारतीय नौदलाला बळ
sakal

बोलून बातमी शोधा

‘ब्राह्मोस’चे भारतीय नौदलाला बळ

भारत आणि रशियाची संयुक्त भागीदारी असणाऱ्या ‘ब्राह्मोस’ एअरोस्पेस या संस्थेच्या माध्यमातून या ध्वनीपेक्षाही अधिक वेगाने लक्ष्यभेद करणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे.

‘ब्राह्मोस’चे भारतीय नौदलाला बळ

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - भारतीय नौदलासाठी तयार केलेल्या ‘ब्राह्मोस’ या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची आज अरबी समुद्रात स्वदेशी बनावटीच्या विनाशिकेवरून यशस्वी चाचणी घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

आयएनएस चेन्नई या विनाशिकेवरून हे क्षेपणास्त्र झेपावल्यानंतर त्याने हवेमध्येच अत्यंत किचकट अशी वळणे घेत लक्ष्याचा अचूक भेद घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नौदलाच्या भात्यामध्ये या नव्या क्षेपणास्त्राचा समावेश झाल्याने त्याची मारकक्षमता आणखी वाढणार आहे. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून दूरवरच्या लक्ष्याचा यशस्वीरीत्या भेद घेता येईल, असे संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारत आणि रशियाची संयुक्त भागीदारी असणाऱ्या ‘ब्राह्मोस’ एअरोस्पेस या संस्थेच्या माध्यमातून या ध्वनीपेक्षाही अधिक वेगाने लक्ष्यभेद करणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र पाणबुड्या, जहाजा, विमाने आणि जमिनीवरील कोणत्याही प्रक्षेपक ठिकाणावरून सहज डागता येते. या क्षेपणास्त्राच्या  यशस्वी चाचणीनंतर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) स्वागत केले आहे. डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांनीही चाचणी घेण्यात सहभागी असणारे शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. या क्षेपणास्त्राच्या आगमनामुळे भारतीय लष्कराची ताकद अनेक पटींनी वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मिसाईल पॉवर
२९० किलोमीटर - मारकक्षमता
२.८ मॅक - क्षेपणास्त्राचा वेग