"ब्राह्मोस'चे आयुष्मान वाढणार ; येत्या आठवड्यात होणार चाचणी 

पीटीआय
सोमवार, 9 जुलै 2018

"ब्राह्मोस' या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे आयुष्यमान वाढविण्याचे प्रयत्न सुरू असून, या अनुषंगाने त्याची लवकरच चाचणी घेतली जाईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

बडोदा : "ब्राह्मोस' या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे आयुष्यमान वाढविण्याचे प्रयत्न सुरू असून, या अनुषंगाने त्याची लवकरच चाचणी घेतली जाईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

पुढील आठवड्यात ओडिशातील चांदीपूर येथील केंद्रावरून ही चाचणी घेतली जाणार असल्याचे ब्राह्मोस एअरोस्पेसचे प्रमुख सुधीर कुमार मिश्रा यांनी सांगितले. लार्सन अँड टुब्रोच्या एका प्रकल्पाचे उद्‌घाटन मिश्रा यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. या प्रकल्पात क्षेपणास्त्रामध्ये स्टोरेजसाठी आवश्‍यक कॅनिस्टरची निर्मिती होणार आहे. मिश्रा म्हणाले, ""या क्षेपणास्त्राचे सध्याचे आयुष्यमान 10 वर्षे इतके असून, ते 15 वर्षांपर्यंत वाढविले जाणार आहे. यामुळे लष्कराला ही क्षेपणास्त्रे दीर्घकाळ सज्ज ठेवता येतील.'' 

"इस्रो'च्या मानवरहित मोहिमेची तयारी 
बंगळूर : भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) मानवी अवकाश मोहिमांसाठी महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान विकसित करत असून, त्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे महिनाभरात तयार होतील, अशी माहिती इस्रोचे चेअरमन के. सिवन यांनी दिली. मानवी मोहिमांद्वारे अनेक देश अंतराळाचा फायदा उठवत आहेत. अशात भारताने मागे राहून चालणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

Web Title: Brahmos will increase the lifespan