मोदींच्या 'नमो' ऍपने करून दिली कोट्यावधींची कमाई

namo app
namo app

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तीक 'नमो' ऍपने गेल्या तीन महिन्यांमध्ये कोट्यावधी रुपयांची कमाई करून दिली आहे. ऍपमध्ये टी-शर्टपासून पेनपर्यंत अनेक नमो मर्चंडाइजचा समावेश असून, 90 दिवसांमध्ये या अॅपवरून 15 लाख 75 हजार वस्तू विकल्या गेल्या आहेत.

नमो ऍपवरून सर्वाधिक खरेदी ही भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमधून आणि देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. गेल्या महिन्यापासून पेटीएम आणि अॅमेझॉनसारख्या माध्यमातूनही ‘नमो’ ब्रॅण्डच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या डिजीटल इंडियाचा फायदा त्यांच्याच वस्तूविक्रीला अधिक झाल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी या नेत्यांनी नमो ब्रॅण्डच्या वस्तू घेण्याचे आवाहन आपल्या समर्थकांना केले आहे. या दोन्ही गोष्टींमुळे नमो ब्रॅण्डच्या वस्तूंचा खप वाढल्याचे समजते. हिमाचल प्रदेशमधून भाजपाचे खासदार असलेल्या अनुराग ठाकूर आणि सामाजिक न्याय मंत्र्यांना ‘नमो अगेन’ची टीशर्ट घालून ट्विटवर फोटो पोस्ट केले आहेत. ही नमो टी-शर्ट नमो अॅपवर 499 रुपयांना उपलब्ध आहेत. एकूण विक्री झालेल्या वस्तूंपैकी 50 टक्के टी-शर्टस आहेत.

दरम्यान, 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त नमो ब्रॅण्डच्या वस्तूंवर विशेष सेलअंतर्गत सवलत देण्यात आली होती. या काळामध्ये विकल्या गेलेल्या टी-शर्टमधून एकूण 2 कोटी 64 लाखांची कमाई झाली. टी-शर्टसबरोबरच 56 लाखांच्या टोप्या, 43 लाखांचे किचैन्स, 37 लाखांचे कॉफी मग व 32 लाखांच्या वह्या विकल्या गेल्या आहेत. शिवाय, नमो ब्रॅण्डच्या पेन विक्रीमधून 38 लाखांची कमाई झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com