नागाचा फणा अन् कोंबडीची चोच; पाहा व्हिडिओ...

वृत्तसंस्था
Friday, 22 May 2020

नाग कोंबडीच्या पिलांची शिकार करण्याचा प्रयत्न करतो. पण, कोंबडी त्यांना वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करते. नागाचा फणा आणि कोंबडीच्या चोचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली: नाग कोंबडीच्या पिलांची शिकार करण्याचा प्रयत्न करतो. पण, कोंबडी त्यांना वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करते. नागाचा फणा आणि कोंबडीच्या चोचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलिस चौकीतच कापला एकाने पोलिसाचा कान...

आयएफएस सुशांता नंदा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स या बहादूर आईचे कौतुक करत आहेत. संबंधित व्हिडिओत एक कोंबडी तिच्या पिलांचा बचाव करण्यासाठी थेट एका कोब्रासोबत लढली आहे. पिलांना सुरक्षितपणे बाजूला करण्यासाठी कोंबडी फणा काढलेल्या कोब्रासोबत लढताना दिसत आहे. या व्हिडिओला नंदा यांनी शिर्षक देताना असे लिहिले की, 'बॅटल रॉयल, जेव्हा आई तिच्या लेकरांच्या रक्षणासाठी लढते तेव्हा तो मुकाबला आरपार असतो. इथे एक बहादूर आई कोब्रापासून तिच्या पिल्लांना वाचवते'

कोरोना रुग्ण वेंटिलेटर काढताच गर्लफेंडला म्हणाला...

आई ही आई असते. आपल्या बाळांना वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून त्यांना वाचवते. आईचे हे रूप फक्त मनुष्यांमध्येच नाही तर पक्षी आणि इतर प्राण्यांमध्येही बघायला मिळते. सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brave hen saves her chicks fighting cobra video goes viral