esakal | पोलिस चौकीतच कापला एकाने पोलिसाचा कान...
sakal

बोलून बातमी शोधा

youth attacked on police in police station over coronavirus mask at madhya pradesh

देशात लॉकडाऊनदरम्यान पोलिसांवर होणाऱया हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एका संशयित आरोपीने चौकीतच पोलिसाचा कान कापल्याची घटना येथे घडली. यानंतर पळून गेलेल्या संशयिताला अटक करण्यात आली आहे.

पोलिस चौकीतच कापला एकाने पोलिसाचा कान...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भोपाळ (मध्य प्रदेश): देशात लॉकडाऊनदरम्यान पोलिसांवर होणाऱया हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एका संशयित आरोपीने चौकीतच पोलिसाचा कान कापल्याची घटना येथे घडली. यानंतर पळून गेलेल्या संशयिताला अटक करण्यात आली आहे.

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला; पोलिस हुतात्मा

अशोकनगरमधील बहादूरपूर पोलिस चौकीत ही घटना घडल्यामुळे खळबड उडाली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना व्हायरसमुळे पोलिसांनी एकाला मास्क घालून चौकीत येण्यास सांगितले. पण, तो ऐकत नव्हता. काही वेळानंतर तो पुन्हा मास्क न घालताच चौकीत आला. पोलिस कर्मचारी शाहिद खान यांनी त्याला आतमध्ये येण्यास मज्जाव घातला. शिवाय, मास्क न घातल्यामुळे काही अंतरावरून बोलण्यास सांगितले. यामुळे चिडलेल्या युवकाने खिशातून चाकू काढून खान यांच्यावर हल्ला केला आणि कान कापला. यावेळी झालेल्या झटापटीत युवकाच्याही बोटाला दुखापत झाली. पण, हल्ल्यानंतर युवक पळून गेला.

हेल्मेट ओळखणार कोरोनाची लक्षणं...

पोलिसावर हल्ला झाल्याची माहिती समजताच घटनास्थळी पोलिसांची कुमक दाखल झाली. पोलिसांनी हल्ला करणाऱया युवकाला पकडले असून, अटक केली आहे. त्याने रागाच्या भरात हल्ला केल्याचे सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस अधिकारी स्वाती गुप्ता यांनी सांगितले की, 'धीरा चक्र (वय 23) असे आरोपीचे आहे. युवक स्वभावाने विक्षिप्त असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत पुढील माहिती घेत आहोत.'

माझे रडून झाले, आता तुझी रडण्याची वेळ...

loading image