केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोग आणि राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून एकाच जागी 3 वर्षे नोकरी करीत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बादल्या करण्याचे निर्देश दिले आहेत.
एमआयडीसी मधील पुष्कर केमिकल कंपनीच्या प्लांट नंबर एकमध्ये वायू गळती झाल्याची घटना घडलीय. वायुगळतीमुळे परिसरातील ग्रामस्थ भयभीत झालेत. एकाच महिन्यातील पुष्कर केमिकल कंपनीमधील वायू गळतीची तिसरी घटना आहे.
Pune: भवानी पेठेतील एका सोसायटीमध्ये पोलिसांनी छापा टाकून १४ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.
'स्वतंत्र भारतासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून भारतीय कुस्तीला नवी उंची मिळवून देणारे पै. स्व. खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, यासाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेतली.
महाविकास आघाडीची ७ ऑगस्टला महत्त्वाची बैठक होणार आहे. जागावाटप ही बैठक असणार आहे. ही बैठक मुंबईत होणार आहे.
राज्याचे नवे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी बुधवारी राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली.
Beed Rain: बीड जिल्ह्यात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावलीय. बीडसह जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस सुरू झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे.. 11 टिएमसी क्षमता असलेल्या धरणातील पाण्याने 90 टक्यांची पातळी ओलांडली असून पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी विजनिर्मीतीसह धरणाच्या गेटमधून 1430 क्यूसेक वेगाने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे
बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेसाठी बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरेंची भेटीला गेल्याचे सांगितले जात आहे.
धोम धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने कृष्णा नदीला पूर आला असून पाणी महागणपती मंदिरापर्यंत पोहोचले आहे.
भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्या बॉडीगार्डने जीवन संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये.
चुकीचा सिग्नल दिल्याने बदलापूरजवळ मालगाडी अडकली आहे, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
नागपुरातील इतवारा बाजारातील होलसेल बांगरे मोहला येथील आहुजा पेन मार्ट दुकानातील वरच्या माळावर आग लागल्याची घटना समोर आली आहे.
- पेन मार्ट आणि स्टेशनरीचे होल सेल विक्रेता आहे ..
- वरील माळ्यावर मोठ्या प्रमाणात स्टेशनची साहित्य स्टॉक असल्याची माहिती...
- या आगीत साहित्य जळल्यानं मोठं नुकसान झाल्याची माहिती...
- बाजाराचा परिसर असून आतमध्ये अग्निशमक बंब पोहोचू न शकल्यामुळे दूरवरून पाईपच्या साह्याने पाणी पोहचवत पाण्याचा मारा करण्यात आला..
- चार ते पाच अग्निशामक बंब घटनास्थळी पोहचले असून पाण्याचा मारा सुरू...
- आगीच कारण मात्र अस्पष्ट
शिवसेना (UBT) खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, "जनगणना हा लोककल्याणकारी योजना राबविण्याचा महत्त्वाचा दुवा आहे. पण भाजप जात जनगणना करू देत नाही. जात जनगणना झाली तर कळेल." समाजातील एक घटक मागे पडला आहे, ज्यांना अधिक मदतीची गरज आहे… लोककल्याणाच्या योजना योग्य ठिकाणी नेण्यासाठी हे आवश्यक आहे.
राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड म्हणाले, "आरएसएस संघटनेला या राष्ट्राच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याचा पूर्ण घटनात्मक अधिकार आहे. या संघटनेची विश्वासार्हता निर्दोष आहे, त्यात निस्वार्थी लोकांचा समावेश आहे. RSS एक संघटना म्हणून राष्ट्रीय कल्याणासाठी, आपल्या संस्कृतीसाठी आणि प्रत्येकासाठी योगदान देत आहे, RSS असे कार्य करत आहे त्याचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे..."
जुन्या राजेंद्र नगर कोचिंग सेंटरच्या घटनेनंतर दिल्लीचे मंत्री आतिशी, गोपाल राय, महापौर शेली ओबेरॉय आणि आपचे आमदार दुर्गेश पाठक यांनी UPSC विद्यार्थ्यांसोबत बैठक घेतली.
महाराष्ट्राच्या लोककलेला दीर्घ परंपरेचा वारसा आहे. मात्र अलीकडच्या काळात बदलत्या तंत्रज्ञानाच्या नावाखाली काही ठिकाणी लोककलेला विभस्त स्वरूप आले आहे. हे टाळण्यासाठी आणि आपली अस्सल लोककला, लावणी काय आहे? हे तरुण पिढीला दाखवणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर लोक कलावंतांना प्रोत्साहान देण्यासाठी भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कला महोत्सव २०२४ लावणी महोत्सव व महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र कर्मचारी कामगार संघटनेच्या वतीने आज छत्रपती संभाजी नगरच्या घाटी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचार्यानी आंदोलनं केलं. यावेळी मोठ्या संघटनेने घाटी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. कोविड काळात घाटी रुग्णालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली होती. त्या कोविड योध्यांना कायम स्वरुपी नोकरीत सामावून घेतले नसल्याने हे आंदोलनं कऱण्यात आलंय. यावेळी जोरदार घोषणाबाजी या कर्मचाऱ्यांनी केली. दरम्यान कोविड योद्धा च्या पोटावर लाथ मारणे बंद करा शिवाय सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तर मग आम्हालाही लाडका भाऊ म्हणुन कायमस्वरूपी कामावर रुजू करून घेण्यात यावे अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली.
पुणे- बेंगलोर महामार्गावरती सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामामुळे आणि पडलेल्या खड्ड्यांमुळे कोल्हापूर ते पुणे जाण्यासाठी आता सात ते आठ तास लागत आहेत. या परिस्थितीमुळे पुणे -बेंगलोर महामार्गावरती टोल आकारू नये तसेच स्थानिकांना टोल माफी द्यावी. याकरिता शनिवारी दिनांक 3 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे आमदार टोल नाक्यावरती एकत्रित येऊन आंदोलन करणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिली .
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज अजित पवारांच्या शासकीय बंगल्यावर आंदोलनाचा इशारा दिला होता. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.
यवतमाळच्या बाभुळगांव तालुक्यातील शेवटच्या टोकावरील तांबा या गावाजवळून वर्धा नदी वाहते.दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या वर्धा नदीवरील पूल खचल्याने दोन्ही जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे.सध्या खचलेल्या पुलावरून वाहतुक बंद असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या खचलेल्या पुलाचे काम त्वरित करण्याची मागणी दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांकडून केली जात आहे.
ओबीसी आंदोलक दत्तात्रय आनंतवार यांनी मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.नांदेडच्या हदगाव तालुक्यातील कवाना या गावी आनंतवार यांनी मागील 12 दिवसापासून उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ नांदेडच्या हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात ओबीसी बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.आनंतवार यांच्या समर्थनार्थ आज नांदेडच्या हदगाव मध्ये बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. हदगाव शहर आज कडकडीत बंद ठेऊन ओबीसी बांधवांनी मोर्चा काढला. हा मोर्चा हदगाव तहसील कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चात ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई म्हणाले, "आज रामेन डेका यांनी छत्तीसगडचे नवीन राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मी त्यांना शुभेच्छा देतो... छत्तीसगडचे आसामशी जुने संबंध आहेत. छत्तीसगडमधील मोठ्या संख्येने लोक चहाच्या बागांमध्ये काम करण्यासाठी तेथे गेले होते. आणि ते तिथेच स्थायिक झाले आहेत, त्यांच्यापैकी बरेच जण आमदार आणि खासदार झाले आसाम आणि छत्तीसगडची मैत्री आणखी घट्ट होईल, रामेन डेका यांच्या मार्गदर्शनाखाली छत्तीसगड वेगाने प्रगती करेल."
शिवसेना (शिंदे गट) खासदार धैर्यशील माने यांची शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संसदीय पक्षाची बैठक घेतली होती. बैठकीत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मते जाणून घेतली... त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून देण्यात आली माहिती.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने बुधवारी, ३१ जुलै २०२४ रोजी दिलेल्या माहितीनुसार, इचलकरंजी पंचगंगा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी आज सकाळी १०:०० वाजता ७१ फूट ७ इंच इतकी नोंदवली गेली आहे. इशारा पातळी ६८ फूट आहे, तर धोका पातळी ७१ फूट आहे. काल पासून पाणी पातळी ११ इंचांनी कमी झाली आहे
जुन्नर वनपरिक्षेत्रातील खेड आंबेगाव जुन्नर शिरुर तालुक्यात हिंसक झालेले बिबट पकडण्यात आले होते. या बिबट्यावर माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात उपचार करण्यात आले. आता उपचारानंतर या हिंसक बिबट्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर गुजरातला पाठविण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये समन्वय ठेवण्यासाठी ही समिती काम करणार आहे.
काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात.
राष्ट्रवादी शरद पवारांकडून जयंत पाटील आणि अनिल देशमुख.
ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि सुभाष देसाई किंवा अनिल परब.
संसदेत काँग्रेस संसदीय पक्षाच्या सर्वसाधारण सभेत वायनाड भूस्खलनात बळी पडलेल्यांसाठी मौन पाळत श्रद्धांजली वाहण्यात आली.
आपल्या शेतात पिकलेल्या मालाची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षापासून ई पीक पाहण्याची प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यंदा पिक पाहणी न करू शकलेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत तसेच पीक विमा पासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. कारण सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई पीक पाहणी बंधनकारक केली असून 1 ऑगस्ट पासून नोंदणीला सुरुवात होणार आहे तर 15 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना ही नोंदणी करता येईल. त्यामुळं सर्वांनी मुदतीच्या आत पीक पाहणी करावी असं आवाहन कृषी विभागाने केलंय.
पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात येवा सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी २:०० वा. धरणाची वक्र दरवाजे उचलून सांडव्यावरून व विद्युत गृह मधून एकूण 5000 क्युसेक्स विसर्ग नदी पात्रात सुरू करण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण व पाण्याची आवक यानुसार विसर्ग कमी जास्त होऊ शकतो. याची उरमोडी नदी काठच्या सर्व ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. कोणत्याही कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये, असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी संजय राऊत यांनी भाष्य केलंय. या राज्याची संस्कृती बदलत आहे. मोदी शाह यांच्यामुळे डर्टी राजकारणी सत्तेवर बसले आहेत.राज्याच्या इतिहासात यांची नावं काळ्या अक्षरात लिहिली जातील, अशी टीका त्यांनी केली.
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरून वाहतूक होण्यास सुरुवात झाली आहे. सततच्या पावसामुळे पंचगंगेच्या पाण्याची पातळी वाढली होती. पण, आता पाऊस थांबला असल्याने पाणी पातळीमध्ये घट झाली आहे.
कोल्हापुरात रात्री जोरदार पाऊस झाला आहे. राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे आज सकाळी पाच वाजून 55 मिनिटांनी उघडले आहेत.
इस्रायलने लेबनीजची राजधानी बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरावर हल्ला करून हिजबुल्लाच्या एका प्रमुख कमांडरला ठार केल्याचं म्हटलंय. लेबनीज सशस्त्र गटाचा बालेकिल्ला असलेल्या दहियाह येथे झालेल्या स्फोटात किमान एक जण ठार आणि अनेक जण जखमी झालेत.
वारणा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने आज दुपारी १२:३० वा वारणा धरणातून सद्यस्थित सुरु असलेल्या ८०९२ क्यूसेक विसर्गात वाढ करुन वक्रद्वार द्वारे १०११५ क्युसेक व विद्युत जनित्र मधून १४७० क्यूसेक असे एकूण ११५८५ विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे, तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे वारणा धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे.
काँग्रेस लोकसभेत जात जनगणना आणि महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करणार आहे. काँग्रेसचे व्हिप मणिकम टागोर यांनी सभागृहात प्रस्ताव मांडला आहे.
कोल्हापूर : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साजरी होणारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांचा दौरा या अनुषंगाने पोलिस बंदोबस्ताचा आढावा मंगळवारी घेण्यात आला. पोलिस मुख्यालयात झालेल्या बैठकीत प्रभारी अधिकाऱ्यांकडून पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी माहिती घेतली. तसेच शहरात कडेकोट बंदोबस्ताच्या सूचनाही केल्या. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होते. कोल्हापुरातही जयंती सोहळे होणार आहेत. यानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकांसाठीचे शहरातील वाहतुकीचे नियोजन, होणारी गर्दी लक्षात घेऊन याची माहिती घेण्यात आली. तसेच नऊ ऑगस्टला जरांगे-पाटील यांच्या नियोजित दौऱ्यासह शांतता रॅलीचा मार्ग, सहभागींची संख्या, ठिकाण याबाबत चर्चा करून प्रभारी अधिकाऱ्यांनी सूचना करण्यात आल्या.
आज पहाटे नोएडातील एका झोपडपट्टीला लागलेल्या आगीत तीन मुलांचा मृत्यू झाला. एक जण गंभीर भाजला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवून सर्व लोकांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं. आस्था (१० वर्षे), नैना (७ वर्षे) आणि आराध्या (५ वर्षे) अशी मृत मुलींची नावे आहेत.
बेळगाव : तोतया गुप्तचर विभाग (आयबी) अधिकाऱ्याला माळमारुती पोलिसांनी आज (ता. ३०) अटक करून त्याच्याकडून मोटार आणि बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले. दयानंद रामू जिंड्राळे (वय ३३, रा. नवीन सरकारी रुग्णालय, इस्लामपूर, ता. हुक्केरी, जि. बेळगाव, सध्या राहणार प्लॉट क्र. ३६, सेक्टर क्र. ९, अंजनेयनगर, बेळगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
बंगळूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात ची. ना. रामू या दलित नेत्याने जनहित याचिका दाखल केली आहे. रामू यांनी आरोप केला की, काँग्रेस नेत्याने कर्नाटकातील एका जाहीर भाषणात हासनचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याने सामूहिक बलात्कार केल्याचा उल्लेख केला होता. ज्याने त्याची व्हिडिओग्राफही केला होता. अखिल भारतीय दलित कृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले रामू यांनी आरोप केला की, आतापर्यंत अत्याराचा कोणताही पुरावा सापडला नाही किंवा राहुल गांधींनी केलेल्या दाव्याबद्दल महिलांनी कोणतीही तक्रार केलेली नाही. वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली.
गडहिंग्लज : हिरण्यकेशी नदीवरील भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे पुलाजवळील रस्त्यावर पडलेले खड्डे भरून घेतल्याने या पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. यामुळे गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावरील वाहतूक आठवडाभराने सुरळीत सुरू झाली आहे.
बाजारभोगाव : पोहाळे तर्फ बोरगावदरम्यान असणाऱ्या मोरीवर आलेले पुराचे पाणी मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास उतरले. त्यामुळे तब्बल बारा दिवसांनी कोल्हापूर-बाजारभोगाव-अणुस्कुरा-राजापूर हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. मागील दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने कासारी व जांभळी नद्यांच्या पुराचे पाणी उतरले आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने जांभळी खोऱ्याचा संपर्क संपूर्णपणे तुटला होता, तर बाजारभोगावच्या बाजारपेठेमध्ये पुराचे पाणी आले होते.
नृसिंहवाडी : येथे एक ऑगस्ट रोजी ‘आंदोलन अंकुश’ संघटनेकडून ‘जल सत्याग्रह’ आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती आंदोलनचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
Latest Marathi Live Updates 31 July 2024 : केरळच्या निसर्गसुंदर वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मंगळवारी पहाटे दोन वाजता चार गावांत मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने आतापर्यंत 143 जणांचा गाढ झोपेत मृत्यू झाला आहे. यात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर, पश्चिम बंगालमधील रेशन गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील दहा विविध ठिकाणांवर छापे घातले. धरण क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर व पंचगंगेची पातळी सव्वा फुटाने कमी झालीये. राधानगरी धरणाच्या दोन स्वयंचलित दरवाजातून ४३५६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. शहरातील पूर ओसरल्याने अंतर्गत बंद झालेले रस्ते पुन्हा खुले झाले. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.