Dance Video - ‘हुस्न है सुहाना’ गाण्यावर नववधुचे जबरदस्त ठुमके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dance Video - ‘हुस्न है सुहाना’ गाण्यावर नववधुचे जबरदस्त ठुमके

Dance Video - ‘हुस्न है सुहाना’ गाण्यावर नववधुचे जबरदस्त ठुमके

सध्या सोशल मिडियावर काही पोस्ट केल्यानंतर काही काळातच त्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस सुरु होता. आजकाल बऱ्याच इव्हेंट, कार्यक्रमांचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर फिरत असतात. हल्ली लग्नातील अनेक क्षण टिपणारे उत्तम व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकीच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर फिरत आहे. हा व्हिडिओ आहे एका नवरीचा. यात ती आपल्या मैत्रिणींसोबत एंजॉय करताना दिसत आहे. स्वत:च्या लग्नात एका इव्हेंटमध्ये डान्स करताना दिसत आहे. नवरीबाईचा हा जबरदस्त डान्सचा व्हिडोओ व्हायरल झाला आहे. नवरीबाई आणि तिच्या मैत्रिणींनी कुली नंबर 1 चित्रपटातील ‘हुस्न है सुहाना’ गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळतं. व्हिडिओमधील या तरुणीचे नाव सोविना चावला असे आहे. तिचा हा व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे.

सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक केले असून कमेंट्सही केल्या आहेत. व्हिडिओमध्ये नवरीबाई आणि तिची गर्ल गँग (मैत्रिणी) गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ग्रुपचा हा खास डान्स तिथे उपस्थित इतर लोकही एन्जॉय करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये लोक टाळ्या वाजवताना आणि शूटिंग करताना दिसतात. हा डान्स सोशल मीडिया यूजर्सला इतका आवडला आहे की लोकांनी तो इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर केला आहे.

टॅग्स :Video Clip