रडण्याच्या नादात नवरीमुळे सुटली नवरदेवाची लुंगी

पाठवणीच्या वेळी नववधुला अश्रू इतके अनावर झाले, की...
रडण्याच्या नादात नवरीमुळे सुटली नवरदेवाची लुंगी
Updated on

लग्नसमारंभ wedding म्हणजे आनंद आणि उत्साहाचं वातावरण. परंतु, अनेकदा उत्साहाच्या भरात अशा काही घटना घडतात ज्यामुळे चारचौघात चांगलंच हसू होतं. त्यातच आता सोशल मीडियाचा जमाना आहे म्हटल्यावर काही विचारायलाच नको. लग्नात घडणारे अनेक मजेशीर किस्से सोशल नेटवर्किंग साईटवर लगेच व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. एका नववधुला पाठवणीच्या वेळी अश्रू इतके अनावर झाले, की रडण्याच्या नादात तिच्यामुळे नवऱ्याची लुंगी सुटली याचाही तिला पत्ता लागला नाही.(bride-crying-groom-lungi-went-off-in-public-funny-wedding-video)

मुलगी सासरी जायला निघाली की माहेरच्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येतं. अनेकदा पाठवणीचे असे व्हिडीओ पाहिले की आपल्याही डोळ्यात नकळतपणे पाणी येतं. मात्र, आता व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहिलात तर हसून हसून डोळ्यात पाणी येईल.

रडण्याच्या नादात नवरीमुळे सुटली नवरदेवाची लुंगी
मोबाईलमध्ये पाहणं भोवलं; आय ड्रॉपऐवजी डोळ्यात घातला नेल ग्लू

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका नववधुची पाठवणी होत आहे. त्यामुळे एकीकडे नवरदेव घरातील मोठ्या माणसांचे आशीर्वाद घेतोय. तर, नववधू माहेरच्या प्रत्येक व्यक्तीची गळाभेट घेत आहे. यामध्येच नवरदेव आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकला असतानाच वधुला घरातील एक तरुणी दिसते आणि ती तिच्याकडे धाव घेत जोरजोरात रडू लागते. विशेष म्हणजे या दोघी जणी रडत असताना गोलगोल फेरी मारत असतात. यामध्येच वधुच्या साडीला नवरदेवाच्या लुंगीची गाठ बांधलेली असते याचाही तिला विसर पडतो आणि ती रडण्यात मग्न होते, मात्र, रडत रडत गोल फिरण्याच्या नादात नवरदेवाची लुंगी सुटते आणि साऱ्यांसमोर त्याची फजिती होते.

दरम्यान, घडलेला हा प्रकार पाहिल्यानंतर उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच हसू अनावर झालं. मात्र, तरीदेखील चार लोकांमध्ये नवऱ्याची लुंगी सुटली याची जराही कल्पना या वधुला आली नाही. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com