Viral Video| 'जीम'मध्येच नवरीचं 'प्री वेडिंग' फोटोशूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 'जीम'मध्येच नवरीचं 'प्री वेडिंग' फोटोशूट

नववधू तिच्या लग्नाआधीच थेट जिममध्ये पुशअप्स करताना दिसतेय.

Viral Video| 'जीम'मध्येच नवरीचं 'प्री वेडिंग' फोटोशूट

प्रत्येकाच्या आयुष्यातील लग्न हा एक महत्त्वाचा क्षण. लग्नातील हा क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. यासाठी आजकाल जो तो काही वेगळ्या पध्दतीने लग्न कसं करता येईल, याचा विचार करतोय. सध्या अशाच पद्धतीने काहीतरी हटके करण्यासाठी एका नववधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये ही नववधू तिच्या लग्नाआधीच थेट जिममध्ये पुशअप्स करताना दिसतेय.

हेही वाचा: Viral Video : चिमुरड्याने थेट टीव्हीच फोडला; पाहा व्हिडिओ

लग्न म्हणले की, लगेच विचार येतो तो म्हणजे नववधूचे कपडे, दागिने, तिचा संसार, भांडे, मेकअप आणि फोटोशूट आणि बरचं काही खरेदी करण्याची घाई तिची सुरु असते. परंतु या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नववधू चक्क प्री-वेडिंग शूटसाठी जिममध्ये पोहोचलेली दिसत आहे. नववधू साडीवर जिममध्ये पुशअप्स करताना दिसत आहे. त्यामुळे तिचे सगळीकडे जास्तच कौतुक केले जात आहे.

हेही वाचा: Viral Video: कियारा की ती चिमुरडी, तुम्हीच सांगा बेस्ट कोण?

व्हिडिओमध्ये पाहू शकता, ही नववधू पूर्णपणे तयार झालेली आहे. तिने सुंदर साडी घालून दागिनेही घातली आहे. पण अशी तयार होऊन ती एखाद्या बाहुलीसारखी किंवा इतर नवरीसारखी लाजत मुरडत किंवा स्वतःला आरशात पाहत बसली नाही तर तिने जिममध्ये पुशअप्स करताना दिसतेय. हे असं प्री-वेडिंग शूट पाहिलं नसेल.

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांच्या पोस्टनुसार हा व्हिडिओ प्री-वेडिंग शूटचा आहे. म्हणजे ही नवरी फिटनेस फ्रीक असून ती जीममध्येच प्री-वेडिंग शूट करताना दिसतेय. हिमतीचं आज गुपित उलगडलं असं मजेशीर कॅप्शनही त्यांनी या व्हिडिओला दिलं आहे. प्री वेडिंग शूटचा हा मजेदार व्हिडिओ आतापर्यंत लाखोंवेळा पाहिला गेला आहे. तसेच मोठ्या संख्येने नेटिझन्सनी कमेंट्सही केल्या आहेत.

loading image
go to top