esakal | Viral Video: कियारा की ती चिमुरडी, तुम्हीच सांगा बेस्ट कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video: कियारा की ती चिमुरडी, तुम्हीच सांगा बेस्ट कोण?

Viral Video: कियारा की ती चिमुरडी, तुम्हीच सांगा बेस्ट कोण?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कियारा अडवाणी (kiara advani) बॉलीवूडमधील (bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिचा आणि सिद्धार्थ मल्होत्रा (siddharth malhotra) यांचा शेरशाह (shershah) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी पसंत केले. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या कियाराचा एक व्हिडिओ सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यात एका चिमुरडीनं डिक्टो कियाराची कॉपी केली आहे. तो प्रसंग शेरशाहमधला आहे. त्या प्रसंगानं चाहत्यांचे मनोरंजन तर झाले आहेच मात्र त्यावरुन कियारा बेस्ट की ती चिमुरडी असा सवाल उपस्थित झाला आहे. अनेकांनी त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कियाराकडे आगामी काळात मोठमोठ्या बॅनरचे चित्रपट आहेत. यासगळ्यात तिच्या शेरशाहनं बाजी मारली आहे.

शेहशाहच्या वेळी अजय देवगणचा भुज द प्राईड ऑफ इंडिया नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र त्यातुलनेत शेरशाहनं बाजी मारली होती. त्यात कियारानं केलेल्या अभिनयाला तिच्या आजवरच्या अभिनयातील सर्वोत्कृष्ठ भूमिका असेही सांगण्यात आले होते. तिनं सिद्धार्थबरोबर मध्यवर्ती भूमिका साकारली होती. सध्या तिच्या त्या भूमिकेची कॉपी एका लहान मुलीनं केली आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आणि त्या व्हिडिओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सिद्धार्थ आपल्या मिशनवर असताना त्यानं कियाराशी फोनवरुन केलेली बातचीत हा त्या सिनेमातील प्रसिद्ध सीन आहे. त्या सीनची कॉपी त्या लहान मुलीनं केली आहे. सिद्धार्थ जेव्हा कियाराशी संवाद साधतो त्यावेळी कियाराचे हावभाव याला चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला होता. त्या चिमुरडीनंही प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.

विशेष म्हणजे त्या लहान मुलीचं नाव देखील कियारा असचं आहे. तिनं त्या सीनला हुबेहुब सादर केलं आहे. त्या बेबी कियाराचं प्रेक्षकांनी वारेमार कौतूक केलं आहे. तिच्या त्या कलेला मनसोक्त दाद दिली आहे. कियाराविषयी सांगायचं झाल्यास, तिचा आणि सिद्धार्थ मल्होत्राचा शेरशाह बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाल्याचे दिसुन आले. त्यात सिद्धार्शनं शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली होती. वास्तविक घटनांवर आधारित हा चित्रपट होता. त्यात बत्रा यांच्या संघर्षमय आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. विक्रम बत्रा यांच्या वैयक्तिक आयुष्यातील त्यात काही प्रसंग दाखवण्यात आले आहे.

हेही वाचा: शिल्पा शेट्टीनं लाडक्या बाप्पाला दिला निरोप: फोटो व्हायरल

हेही वाचा: 'माझ्या बाबांना घेऊन गेला, पाच वर्षे नव्हती गणरायाची प्रतिष्ठापना'

loading image
go to top