नवरीचा व्हायरल व्हिडिओ तर ट्रेलर होता; पिक्चर अभी बाकी है!

टीम ई सकाळ
Tuesday, 9 February 2021

गेल्या आठवड्यात 45 सेकंदाच्या नवरीच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. आता या व्हिडिओबाबत सत्य समोर आलं आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर गेल्या आठवड्यात एका लग्नात नवरी लोटपोट हसत असल्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. यामध्ये स्टेजवर फोटोशूट करताना फोटोग्राफर नवरीचे फोटो जवळून काढत होता. तेव्हा नवरा फोटोग्राफरच्या डोक्यात मारतो असं दिसतं. नवऱ्याने मारलेल्या टपलीने नवरीला हसू आवरत नाही. ती चक्क स्टेजवर बसूनच हसायला सुरुवात करते. गेल्या आठवड्यात 45 सेकंदाच्या नवरीच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. त्यानंतर व्हिडिओ प्रँक असल्याचंही म्हटलं जात होतं. आता याबाबत सत्य समोर आलं आहे. 

लग्नाच्या स्टेजवर शूट केलेला हा व्हिडिओ आहे. यात लग्नाच्या विधीचं फोटोशूट झाल्यानंतर नवरा नवरीचे क्लोजअप फोटो फोटोग्राफर घेत असतो. त्यात फक्त नवरीचे क्लोजअप फोटो घेत असतानाच नवरा पुढे येतो आणि फोटोग्राफरला जोरात डोक्यात मारतो. त्यानंतर स्टेजवरून जाण्यासही सांगतो. नवऱ्याने डोक्यात मारलं तरी फोटोग्राफरही थोडा हसताना दिसतो. तेव्हा अनेकांनी प्रँक असावा अशी शंका व्यक्त केली होती. 

हे वाचा - 'सलमानशी लग्नं करणं माझं स्वप्न होतं, म्हणून 16 व्या वर्षी आले मुंबईला'

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील नवरीनेच आता खरं काय ते सांगितलं आहे. व्हायरल व्हिडिओ हा एका चित्रपटाच्या शूटिंगमधला आहे. व्हिडिओमध्ये नवरी म्हणून असलेली अभिनेत्री ही छत्तीसगढची असून अनिकृती चौहान असं तिचं नाव आहे. अनिकृतीने ट्विटरवरून व्हायरल होत असलेला व्हिडिओ शेअर केला आणि म्हटलं की हा माझ्या चित्रपटातील शूटिंगवेळचा व्हिडिओ आहे. 

अनिकृतीने असंही सांगितलं की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा आगामी चित्रपट डार्लिंग प्यार झुकता नाही यातला आहे. शूटिंगवेळी रेकॉर्ड करण्यात आला होता. जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर अनिकृतीला अनेकांनी लग्नाच्या शुभेच्छा देणारे मेसेज पाठवले. अखेर तिला खुलासा करावा लागला. अनिकृतीने हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या रेणुका मोहनचं आभार मानले आहेत.

हे वाचा - माझ्यापेक्षा भारी आहे का कोणी?; कंगणाची मेरिल स्ट्रीपशी तुलना

कोण आहे अनिकृती
अनिकृती चौहान ही छत्तीसगढच्या चित्रपटात काम करते. अनिकृतीने तिच्या चित्रपट अभिनयाची कारकिर्द 2017 मध्ये सुरु केली होती. ले चल नदिया के पार यामधून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. याशिवाय 36 गढ के हँडसम आणि प्रेम सुमन यामधूनही ती झळकली आहे. सोशल मीडियावरही ती सक्रीय असते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bride laughing wedding viral video truth reveal know