माझ्यापेक्षा भारी आहे का कोणी?; कंगणाची मेरिल स्ट्रीपशी तुलना

actress kangana ranaut says i have raw talent like Meryl Streep
actress kangana ranaut says i have raw talent like Meryl Streep

मुंबई - अभिनेत्री कंगणाचा एक दिवस असा जात नाही की ती चर्चेत नसते. दररोज वेगवेगळ्या कारणांसाठी, ती करत असलेल्या वादग्रस्त विधांनासाठी कंगणाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक या क्षेत्रातील विविध मान्यवरांवर टीका करुन तिनं यापूर्वी राग ओढावून घेतला आहे. सध्या ती एका वेगळ्या कारणासाठी ट्रोल होत आहे. याचे कारण म्हणजे तिनं स्वतची तुलना प्रख्यात हॉलीवूडची अभिनेत्री मेरिल स्ट्रीपशी तुलना केली आहे.

कंगणाच्या अशा प्रकारच्या व्टिटमुळे ती चर्चेत आली आहे. तिच्यावर अनेकांनी टीकाही केली आहे. एवढ्यावरच कंगणा काही थांबलेली नाही. तिनं स्वतला या पृथ्वीतलावरील सर्वात प्रभावी अभिनेत्री असेही म्हटले आहे. यासोबत आपल्या धाकड चित्रपटाचा फोटोही शेयर केला आहे. कंगणानं लिहिलं आहे की, या ग्रहावर ज्या अभिनेत्री आहेत त्यातील सर्वात प्रभावी आणि सक्षम अभिनेत्री म्हणून माझे नाव घ्यावे लागेल. यावेळी तिनं आपली तुलना दिग्गज अभिनेत्री मेरिल स्ट्रीपशी केली आहे. आपल्या व्टिटमध्ये कंगणानं लिहिलं आहे की,  मोठ्या प्रमाणावर आता परिवर्तन होणार आहे. त्याचा एकप्रकारे अलर्ट दिला आहे.

एक अभिनेत्री म्हणून ज्याप्रकारे मी माझ्यातील टँलेट जगासमोर आणले आहे ते सर्वांनी पाहिले आहे. माझ्यासारखी दुसरी कुठली अभिनेत्री नाही. माझ्याजवळ मेरिल स्ट्रीपसारखी प्रतिभाही आहे आणि गेल गॅडोटसारखे ग्लॅमरही आहे. कंगणानं आपल्या आगामी चित्रपटाविषयी माहिती सोशल मीडियावर शेयर केली आहे. त्यात तिचा थलाईवी आणि धाकडचा लूक व्हायरल झाला आहे. ज्यात एकीकडे ती जयललिता आणि दुसरीकडे एजेंट अग्निच्या भूमिकेत दिसत आहे.

कंगणा धाकडमध्ये एजंट अग्निची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कंगणा आणि अर्जून रामपाल यांच्याशिवाय दिव्या दत्ता प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. कंगणानं नुकतेच आपल्या आगामी 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा' चित्रपटाची घोषणा केली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com