esakal | लगीनघाई! गाडी चालवत नवरी लग्नाला हजर, व्हिडिओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

लगीनघाई! गाडी चालवत नवरी लग्नाला हजर, व्हिडिओ व्हायरल

लगीनघाई! गाडी चालवत नवरी लग्नाला हजर, व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे की ज्यामाध्यमातून आता प्रत्येकजण व्यक्त होऊ लागला आहे. कित्येकजण यातून जगासमोर आपल्यातील टॅलेंटला सगळ्यांसमोर सादर करु लागले आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दररोज कित्येक असे व्हि़डिओ व्हायरल होतात की त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होताना दिसते. आताही एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. या व्हिडिओमध्ये ती वधू स्वत: गाडी चालवून लग्नाच्या ठिकाणी जात असल्याचे दिसुन आले आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून तिला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट दिल्या आहे. काहींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी खरचं अशाप्रकारे व्हि़डिओ सोशलाईज्ड करण्याची गरज आहे का, असा प्रश्नही विचारला आहे.

वधू लग्नासाठी स्वत; गाडी चालवत जात असल्याचा व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांना धक्काही बसला आहे. कित्येकांसाठी हे नवीन होतं. गेल्या काही वर्षांपासून लग्न कार्यामध्ये तो क्षण मेमोरेबल करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे फंडे वापरत असल्याचे दिसुन आले आहे. अंडरवॉटर जात लग्न करणे, हॅलिकॉप्टरमध्ये लग्न करणे, असेही प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून समोर आले आहे. आता जो व्हि़डिओ व्हायरल झाला आहे त्यातून तिला लग्नाची भलतीच घाई झाल्याच्या प्रतिक्रिया युझर्सनं दिल्या आहेत.

पारुल गर्ग हिनं तिच्या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेयर केला आहे. ती एक प्रसिद्ध मेक अप आर्टिस्ट आहे. त्या व्हि़डिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती वधू स्वत: गाडी चालवत लग्नाच्या ठिकाणी जात असल्याचे दिसत आहे. त्या व्हि़डिओच्या बॅकग्राउंडला विवाह चित्रपटातील हमारी शादी मैं हे गाणं सुरु आहे. वधूच्या त्या व्हिडिओला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. काहींनी तिचं कौतूक केलं आहे. तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. एका युझर्सनं दिलेल्या कमेंट तिला दिली आहे. त्यात त्यानं लिहिलं आहे, स्वॅगी ब्राईड, दुसऱ्या एकानं लिहिलं आहे, मलाही माझ्या लग्नात अशाप्रकारे इंट्री घ्यायची आहे. त्या व्हि़डिओला आतापर्यत 50 हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

हेही वाचा: Drug case: रिया, दिपीकानंतर आता पुढचं टार्गेट शाहरुख - मलिक

हेही वाचा: Drugs Case: अशी होती आर्यन खानची तुरुंगातील पहिली रात्र

loading image
go to top