Aryan Khan
Aryan KhanSakal

Drugs Case: अशी होती आर्यन खानची तुरुंगातील पहिली रात्र

आर्यनसह सहा आरोपींना शुक्रवारी आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आले.
Published on
Summary

तुरुंगात आर्यनला कोणतीही विशेष वागणूक मिळाली नाही.

Cruise Drugs Bust: क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेला आर्यन खान Aryan Khan याचा जामीन अर्ज मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी फेटाळला. आर्यनच्या जामीन अर्जावर महानगर दंडाधिकारी सुनावणी घेऊन निर्णय देऊ शकत नसल्याचं न्यायालयाने नमूद केलं. आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर आर्यनची आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली. तुरुंगात आर्यनला कोणतीही विशेष वागणूक मिळाली नाही. इतर कैद्यांप्रमाणेच त्याला जेवण दिलं गेलं आणि झोपण्यासाठीची व्यवस्थासुद्धा इतरांप्रमाणेच होती.

Aryan Khan
Drugs case: आर्यनचे वकील सतीश मानेशिंदेंची एका दिवसाची फी ऐकून व्हाल थक्क!

आर्थर रोड तुरुंगाच्या बराक क्रमांक १ मध्ये आर्यन आणि अरबाजला ठेवण्यात आलं आहे. या दोघांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना तुरुंगात क्वारंटाइन करण्यात आलं. कारागृहाच्या नियमांनुसार नवीन आरोपींना सुरुवातीचे काही दिवस (पाच ते सहा) क्वारंटाइन केले जाते. त्यानंतर त्यांची रवानगी इतर कारागृहात केली जाते. 'एबीपी'ने दिलेल्या वृत्तानुसार, आर्यनला रात्री जेवणात मूगाची डाळ, भात, भाजी आणि चपाती देण्यात आली. आर्यनला सोमवारपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे. सत्र न्यायालय बंद असल्याने त्याच्या जामिनाची याचिका दाखल होऊ शकत नाही.

"मी यापूर्वी कोणताही गुन्हा केलेला नाही. एका प्रतिष्ठित कुटुंबातून असून माझे आईवडील आणि भावंडे मुंबईतच राहतात. माझ्याकडे भारतीय पासपोर्टही आहे. त्यामुळे फरारी होणार नाही. शिवाय पुरावे नष्ट करण्याचा प्रश्नच नाही", याचा विचार करून जामीन देण्याची विनंती आर्यनच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com