
उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. बिवार पोलीस स्टेशन परिसरात वधू दाजीसोबत सासरच्या घरातून निघून गेली. ही घटना १९ मे रोजी संध्याकाळी घडल्याचे सांगितले जाते. वधूला घेऊन पळून जाणाऱ्या दाजीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी वधूला त्याच्या घरातून ताब्यात घेतले आहे. पोलीस आता या घटनेबाबत एफआयआर नोंदवण्याची तयारी करत आहेत.