
टक्कल असणाऱ्या मुलासोबत आपण लग्न करणार नाही, अशी भूमिका मुलीनं घेतलीय.
लग्नमंडपात नवरदेवाच्या डोक्यावरील वीग पडल्याने मोडलं लग्न
लग्न हा आयुष्याचा नवा धडा असतो, असं म्हटलं जातं. कारण, या काळात आयुष्यरुपी कोरी पाटी पुन्हा एकदा आपल्या समोर येते आणि त्यावर पुन्हा एकदा आनंदाचा श्रीगणेशा एका स्त्रीला गिरवायचा असतो. लग्नानंतर एका मुलीसाठी सारंच नवीन असतं. घर, माणसं, जबाबदाऱ्या या सर्वच गोष्टींचा ती पहिल्यांदा अनुभव घेत असते. सर्वात खास सासू-सूनेचं नातं निभावणं, त्याच ताळमेळ बसवणं हा एकप्रकारे अनुभवच असतो. त्यामुळे हा अनुभव एकतर सुखद असतो किंवा दु:खद आणि वादाचं कारण बनणारा...
मात्र, उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) एक लग्न एका विचित्र कारणामुळं ऐनवेळी मोडलं गेलंय. नवऱ्या मुलाला टक्कल असल्याचं लक्षात आल्यानं मुलीनं लग्न करण्यास नकार दिल्याचा प्रकार उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यामध्ये (Unnao District) घडलाय. लग्न मंडपामध्ये लग्नाचं अर्ध्याहून अधिक विधी पूर्ण झाल्यानंतर नवऱ्या मुलीला नवरदेवाला टक्कल असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर या मुलीनं लग्नमंडपातच लग्नाला नकार दिला.
हेही वाचा: 'मी हिंदू आहे, वाटल्यास कधीही बीफ खाऊ शकतो'; माजी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
टक्कल असणाऱ्या मुलासोबत आपण लग्न करणार नाही अशी भूमिका मुलीनं घेतली अन् हे लग्न अर्ध्यातच सोडून ती निघून गेली, असं आयएएनएस या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तात म्हटलंय. सकाळी लग्नमंडपात प्रवेश करताना नवऱ्या मुलाला चक्कर आली. नवरा मुलगा चक्कर येऊन खाली पडला अन् त्याच्या डोक्यावरील वीग निघाला. त्यानंतर नवरीकडच्यांना नवरदेवाला टक्कल असल्याचं समजलं. नवरदेवाला टक्कल असल्याचं नवऱ्याकडील मंडळींनी नवरीकडच्यांपासून लपवून ठेवलं होतं. मात्र, आपला होणारा नवरा हा टक्कल असणारा आहे हे समजल्यानंतर मुलीनं लग्नास नकार दिला.
हेही वाचा: 'आप'ला मोठा झटका; मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेल्या उमेदवाराचा भाजपात प्रवेश
नंतर हे प्रकरण थेट पोलीस (Police) स्थानकामध्ये गेलं. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करुनही या मुलीनं लग्नास होकार दिला नाहीय. अखेर पंचायत बोलवण्यात आली. यावेळी नवरीकडच्यांनी आपण मुलीच्या लग्नासाठी पाच लाख 66 हजारांचा खर्च केला होता, असं सांगितलं. नवरदेवाच्या घरच्यांनी हा सर्व खर्च मुलीच्या आई-वडिलांना परत देण्यास होकार दर्शवलाय.
Web Title: Bride Refuses To Marry Bald Groom After Wig Comes Off During Wedding Uttar Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..