esakal | लग्नात ट्विस्ट : नवरी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली; लहान बहिणीशी लावले लग्न
sakal

बोलून बातमी शोधा

bride runs away with boyfriend groom marries minor sister

ओडिशातील कलाहांडी जिल्ह्यात मालपाडा गावात एका लग्नाची तयारी सुरू होती. सगळं सुरळीत चाललेलं. लग्नाच्या मांडवात नवरा मुलगा नवरीची वाट पाहत होता. पण, नवरी काही येईना. ऐनवेळी नवरी मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली.

लग्नात ट्विस्ट : नवरी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली; लहान बहिणीशी लावले लग्न

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

भवानीपटना (ओडिशा) : देशात अजूनही अनेक ठिकाणी बाल विवाह होतात. पोलिस यंत्रणा कितीही सक्षम केली तरी, बालविवाह रोखण्यात बरेच अडथळे येतात. परंतु, ओडिशामध्ये एका लग्नात खूपच मोठा ट्विस्ट आला आणि त्यातून एका अल्पवयीन मुलीचं लग्न लावण्यात आलं. पोलिसांना वेळीच याची माहिती मिळाली आणि त्यांनी अल्पवयीन मुलीची सुटका केली. पण, लग्नातल्या त्या ट्विस्टची चर्चा मात्र गावातच नव्हे तर, देशभर सुरू आहे.

आणखी वाचा - पासपोर्टसाठी आला डीजीलॉकर

ओडिशातील कलाहांडी जिल्ह्यात मालपाडा गावात एका लग्नाची तयारी सुरू होती. सगळं सुरळीत चाललेलं. लग्नाच्या मांडवात नवरा मुलगा नवरीची वाट पाहत होता. पण, नवरी काही येईना. ऐनवेळी नवरी मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. त्यानंतरही वधू लग्न मांडवात परत येईल, या आशेवर नवरा मुलगा होता. पण, वाट पाहूनही मुलगी आली नाही. वराकडची मंडळी संतापली. लग्नाच्या मांडवात वादावादी सुरू झाली. त्यात नवरी मुलगीच्या धाकट्या बहिणीशी मुलाचं लग्न लावण्याचा निर्णय झाला. ऐनवेळेला धाकट्या मुलीला तयार करण्यात आलं आणि लग्नही लावून दिलं. याची माहिती पोलिसांना मिळाली. जिल्हा प्रशासनातील कर्मचारी, नवऱ्या मुलाच्या घरी पोहोचले आणि त्यांनी अल्पवयीन मुलीची तातडीने सुटका करून दिली. याप्रकरणी बाल संरक्षण अधिकारी पुढील कारवाई करत आहेत.

आणखी वाचा - पुण्यात पेट्रोलची शंभरी!

दहावीची परीक्षा तोंडावर
ज्या मुलीचं लग्न लावण्यात आलं ती शाळेत शिकत होती. सध्या दहावीत असलेल्या त्या मुलीची परीक्षा तोंडावर आली असतानाच हा लग्नाचा घाट घालण्यात आला होता. परंतु, जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल घेऊन त्या मुलीची सुटका केल्यामुळं ती आता पुढील शिक्षण घेणार असल्याची माहिती आहे.

बालविवाहाची माहितीच नाही!
जिल्हा प्रशासनाच्या बाल संरक्षण विभागाकडून आणि पोलिसांकडून कारवाई होत असताना, एक धक्कादायक बाब स्पष्ट झाली. ज्या मुलीचं लग्न लावण्यात आलं होतं. त्या मुलीच्या पालकांना, बालविवाह हा गुन्हा आहे, याचीच मुळात माहिती नसल्याचं स्पष्ट झालं.