
उत्तर प्रदेशातील संभलमध्ये एका वधूने लग्नाची वरात परत पाठवली. कारण वराने दारू पिऊन लग्नाची वरात आणली होती. अशा परिस्थितीत वराला दारू प्यायलेला पाहून मुलीच्या बाजूचे लोक संतापले. वधूने लग्न करण्यास नकार दिला. वधू म्हणाली की, जो व्यक्ती त्याच्या लग्नाच्या दिवसापर्यंत शुद्धीवर नाही. तो पुढे काय करेल? असा मुलगा काही उपयोगाचा नाही. मी अशा मुलाशी लग्न करू शकत नाही.