Bridge Collapsed : तेलंगणात पूल कोसळला

बांधकामस्थितीतील पूल वादळामुळे कोसळला
Bridge Collapsed
Bridge Collapsedesakal

हैदराबाद : सुमारे आठ वर्षांपासून तेलंगणातील मनेर नदीवर उभारण्यात येणारा एक किलोमीटरच्या पुलाचा काही भाग सोमवारी मध्यरात्री कोसळला. यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. ही घटना पेद्दापल्ली जिल्ह्यातील ओडेड्डू गावात घडली. वादळी वाऱ्यामुळे पुलाचे दोन खांब कोसळले. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली.

Bridge Collapsed
Nashik News : एसटीत समन्वयाअभावी प्रवाशांना मनस्ताप! घाट दुरूस्तीसाठी बंद, तरीही तलवाडेचे तिकिट देत मध्येच उतरविले

तेलंगणात एक किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम २०१६ पासून सुरू होते. या पुलामुळे जयशंकर भुपालपल्ली जिल्ह्यातील ओडेडूला गार्मिलपल्ली गावाला जोडण्याचे नियोजन होते. या पुलाचे भूमिपूजन २०१६ रोजी झाले होते. त्याचा अंदाजित खर्च ४७.४० कोटी रुपये होते आणि एका वर्षात या पुलाचे काम पूर्ण करण्याचे ध्येय निश्‍चित करण्यात आले होते. मात्र काल रात्री वादळामुळे या पुलाचे दोन खांब अचानक पडले आणि त्यामुळे पूल कोसळला. या पुलामुळे मंथनी आणि परकल तसेच भुपालपल्ली आणि जम्मीकुटा भागातील अंतर सुमारे ५० किलोमीटर कमी होण्याची आशा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com