गायी-म्हशी पाळा, रामदेव बाबांच्या नकली तुपाने कसे तंदुरुस्त राहणार; BJP खासदाराचं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baba Ramdev News

गायी-म्हशी पाळा, रामदेव बाबांच्या नकली तुपाने कसे तंदुरुस्त राहणार; BJP खासदाराचं विधान

उत्तर प्रदेशातील कैसरगंजचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भाजपचे खासदार बाबा रामदेव (रामदेव) यांच्या पतंजलीच्या तुपावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. (brij bhushan sharan singh and Baba Ramdev news in Marathi)

घरी गायी-म्हशी पाळा, नाहीतर रामदेव बाबा यांचे बनावट तूप खाऊन तंदरुस्त कसे राहणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये भाजपचे खासदार काही लोकांना उद्देशून म्हणतात की, "तुमच्या दारात गाय किंवा म्हैस असलीच पाहिजे. दुधाची व्यवस्था झालीच पाहिजे. दूध ही एकच गोष्ट आहे जी गावात सहज मिळू शकते. जर तुमच्या घरात तूप आणि दुधाची व्यवस्था नसेल तर मुलं निरोगी कसे राहतील? रामदेव यांचे बनावट तूप खाल्ल्याने मुलं निरोगी होईल का? त्यामुळे माझी विनंती आहे की गायी-म्हशी पाळा. मी स्वत: म्हशी चारायला जायचो. दूध विकायला जायचो, असंही ते म्हणाले.

यावर अनेक प्रतिक्रिया येत असून भाजपचे लोकही रामदेव बाबा यांच्या प्रोडक्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :BjpBaba Ramdev