मेडल्स गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय खेळाडूंकडून मागे; काय घडलं नेमकं वाचा : Brij Bhushan Singh Controversy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Haridwar protest

Brij Bhushan Singh Controversy: मेडल्स गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय खेळाडूंकडून मागे; काय घडलं नेमकं वाचा

नवी दिल्ली : गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या आंदोलनाला सरकारकडून दाद देण्यात येत नसल्यानं उद्वीग्न झालेल्या कुस्तीपटूंनी आपली ऑलिम्पिकची पदकं हरिद्वार इथं गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता.

पण अखेर त्यांनी यातून माघार घेतली आहे. त्यांची समजूत काढण्यात शेतकरी नेत्यांना यश आलं आहे. पण त्याचं आंदोलन अद्याप संपलेलं नसून उद्या इंडिया गेटवर आंदोलनाची त्यांनी हाक दिली आहे. (Brij Bhushan Singh Controversy wrestlers take back decision to immerse medals in Ganga river)

एएनआयच्या वृत्तानुसार, आंदोलक खेळाडू हे हरिद्वार इथून माघारी निघाले असून शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी त्यांची समजूत काढली आहे. तसेच त्यांच्याकडं पाच दिवसांचा अवधी मागितला असून या काळात यावर तोडगा काढू असं आश्वासन त्यांनी दिलं, एकप्रकारे त्यांनी केंद्र सरकारला पाच दिवसांचा अल्टिमेटमच दिला आहे.

दरम्यान, हरयाणातील शेतकरी नेते नरेश टिकैत आणि राकेश टिकैत यांनी या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्याशी चर्चेसाठी हरिद्वार इथं पोहोचले होते. यावेळी या शेतकरी नेत्यांनी खेळाडूंकडून त्यांच्या हातातील मेडल्स आपल्या ताब्यात घेतली आणि त्यांना पाच दिवसांची वेळ देण्याची विनंती केली. त्यानंतर खेळाडूंनी मागे फिरण्याचा निर्णय घेतला.

साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया हे ऑलिम्पिक विजेते खेळाडू हरिद्वार येथील गंगा नदीच्या पात्रात पदकं विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. लैंगिक शोषणाचे आरोप असलेले कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर अद्यापही कारवाई झाली नसल्यानं या खेळाडूंनी हे टोकाचं पाऊल उचललं होतं.

टॅग्स :Crime NewsDesh news