...तोपर्यंत एकही खेळाडू स्पर्धा खेळणार नाही; महिला कुस्तीपटू आक्रमक : Brij Bhushan Singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakshi Malik

Brij Bhushan Singh: ...तोपर्यंत एकही खेळाडू स्पर्धा खेळणार नाही; महिला कुस्तीपटू आक्रमक

नवी दिल्ली : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) आणि याचे अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटू आक्रमक झाल्या असून जोपर्यंत लैंगिक शोषण करणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत एकही खेळाडू आगामी स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दिल्लीच्या जंतरमंतर मैदानात या खेळाडूंचं निषेध आंदोलन सुरु आहे. (Brij Bhushan Singh WFI no player will participate in any tournament Female Wresteler aggressive)

हेही वाचा: Brij bhushan Singh: लैंगिक शोषणाच्या आरोपांवर बृजभूषण सिंहांनी मांडली बाजू; म्हणाले, मी कारवाई...

कुस्तीपटू विनेश फोगाटनं म्हटलं की, "महिला कुस्तीपटूंना लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागलेल्या २० एक घटना मला माहिती आहेत. यामध्ये अनेक कोच आणि रेफरिंचा देखील समावेश आहे. जोपर्यंत या आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही निषेध आंदोलन करणार आहोत. एकही खेळाडू आगामी एकाही स्पर्धेत सहभागी होणार नाही"

हेही वाचा: Brij Bushan Singh : बृजभूषण सिंहांवर यापूर्वी 11 गुन्हे, पैकी ४ गंभीर; जाणून घ्या राजकीय प्रवास

आमच्या बहिणी सुरक्षित नसतील तर खपवून घेणार नाही - बजरंग पुनिया

इथं आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटू या प्रतिष्ठीत कुटुंबातील आहेत. जर आमच्या बहिणी आणि मुली सुरक्षित नसतील तर हे खपवून घेतलं जाणार नाही. फेडरेशनमध्ये बदल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे, अशी प्रतिक्रिया ऑलिम्पिक मेडल विनर कुस्तीपटू बजरंग पुनिया यानं म्हटलं आहे.

हेही वाचा : दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

फेडरशनमधील घाण तळापर्यंत पोहोचलीए - साक्षी मलिक

संपूर्ण कुस्ती फेडरशन बदललं पाहिजे कारण भविष्यात नवे कुस्तीपटू सुरक्षित राहतील. नवं फेडरेशन अस्तित्वात यायला हवं. इथली घाण तळापर्यंत पोहोचली आहे. आम्ही याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलून यातील सखोल माहिती समोर आणणार आहोत. फेडरेशनमधील लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावर चौकशी झालीच पाहिजे, अशी भूमिका यावेळी ऑलिम्पकपटू साक्षी मलिक हीनं मांडली आहे.

हायकोर्टात पुरावे सादर करणार - फोगाट

जर हायकोर्टानं आम्हाला निर्देश दिले तर आम्ही सर्व पुरावे सादर करु. आम्ही पंतप्रधानांकडेही सर्व पुरावे सादर करण्यास तयार आहोत, असं यावेळी विनेश फोगाट हीन म्हटलं आहे.