Brijbhushan Singh Controversy : बृजभूषण सिंहपेक्षाही श्रीमंत आहे त्यांची पत्नी, इतक्या कोटींची आहे मालकीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brijbhushan Singh Controversy

Brijbhushan Singh Controversy : बृजभूषण सिंहपेक्षाही श्रीमंत आहे त्यांची पत्नी, इतक्या कोटींची आहे मालकीन

Brijbhushan Singh Wife : उत्तर प्रदेशचे केसरगंजचे भाजप खासदार बृजभूषण सिंह सध्या चर्चेत आहे. बृजभूषण सिंह हे रेस्लिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष  सुद्धा आहे. यातच देशातील अनेक मोठ्या महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैगिंक शोषणाचा आरोप लावलाय.

विनेश फोगाट, बजरंग पूनिया, साक्षी मलिक सारख्या अनेक महिला कुस्तीपटू बृजभूषण सिंह विरोधात 18 जानेवारीपासून दिल्ली येथे उपोषणावर बसल्या आहेत. (Brijbhushan Singh wife Ketki Devi Singh is richer than him read about her property wealth and income )

कोण आहेत बृजभूषण सिंह?

8 जानेवारी 1957 ला उत्तर प्रदेशच्या गोंडा येथे विश्वोहरपुर मध्ये बृजभूषण शरण सिंह यांचा जन्म झाला. 1979 मध्ये ते स्टूडेंट यूनियनच्या पॉलिटिक्समधून करिअरला सुरवात केली. 1988 मध्ये ते पहिल्यांदा बीजेपीच्या संपर्कात आले आणि हळूहळू त्यांच्या जिल्ह्यातील नामवंत नेते बनले.

बृजभूषण सिंह आता पर्यंत 6 वेळा लोकसभा निवडणूक जिंकले आहेत. गोंडा, बलरामपुर, अयोध्या सारख्या जिल्ह्यात त्यांचा दबदबा कायम आहे. याशिवाय बृजभूषण सिंह यांनी राम मंदिर आंदोलनात सुद्धा भाग घेतला होता. एवढंच काय तर वादग्रस्त भाग पाडल्याप्रकरणी त्यांना आरोपी बनविण्यात आले होते. मात्र सप्टेंबर 2020 मध्ये कोर्टने त्यांना सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता दिली.

बृजभूषण सिंहपेक्षा श्रीमंत आहे त्यांची पत्नी

2019 च्या निवडणूकीदरम्यान बृजभूषण शरण सिंह यांनी त्यांची मालमत्ता जवळपास 10 कोटी सांगितली होती. मात्र बृजभूषण सिंह हे एकूण 40,185,787 कोटींचे मालक आहे तर आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या पत्नीकडे त्यांच्यापेक्षा जास्त म्हणजेच 63,444,541 कोटींची एकूण मालमत्ता आहे. श्रीमती केतकी देवी सिंह असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे.

बृजभूषण शरण सिंहने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या नावावर 1,57,96,317 रुपयांची जंगम मालमत्ता आहे तर पत्नीच्या नावावर 2,54,44,541 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर बृजभूषण यांच्याजवळ 2,43,89,470 स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नी कडे 3,80,00,000 रुपए की स्थावर मालमत्ता आहे.