Indian Army Day : भारतीय लष्कराची दैदीप्यमान कामगिरी...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

१५ जानेवारी १९४९ या दिवशी शेवटचे ब्रिटिश सेनापती जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून तत्कालीन जनरल करिअप्पा यांनी भारतीय लष्कराची सूत्रे आपल्या हातात घेतली. तेव्हापासून हा दिवस ‘लष्कर दिन’ म्हणून साजरा केला जातो.

१५ जानेवारी १९४९ या दिवशी शेवटचे ब्रिटिश सेनापती जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून तत्कालीन जनरल करिअप्पा यांनी भारतीय लष्कराची सूत्रे आपल्या हातात घेतली. तेव्हापासून हा दिवस ‘लष्कर दिन’ म्हणून साजरा केला जातो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 • भारतीय लष्कराची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करापासून. साहजिकच, ‘ब्रिटिश इंडियन आर्मी’चे स्वातंत्र्यानंतर ‘भारतीय लष्कर’ असे नामांतर झाले.
 • १७७६, कोलकता : ईस्ट इंडिया कंपनीचे भारतीय लष्कर खाते सुरू.
 • १ एप्रिल १८९५ : ब्रिटिशांनी भारतीय लष्कराची मुहूर्तमेढ रोवली.
 • १५ जानेवारी, लष्कर दिन : ब्रिटिशांच्या २०० वर्षांच्या जोखडातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य. देशाची फाळणी, पाकिस्तानच्या निर्मितीच्या कळा आणि तेथून निर्वासितांचे लोंढे भारतात येत होते. जातीय, धार्मिक हिंसाचाराचे थैमान, अशा अराजकाच्या नियंत्रणाची जबाबदारी लष्कराच्या शिरावर होती. त्याचे नेतृत्व होते ब्रिटिश जनरल सर फ्रान्सिस बुचर यांच्याकडे. त्यांच्याकडून लष्कराचे नेतृत्व फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांनी स्वीकारले ते १५ जानेवारी १९४९ रोजी. भारतीयांच्या अभिमानाच्या या घटनेचे स्मरण म्हणून १५ जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणून पाळला जातो.
 • १८९९ : महसूल अधिकारी कोंडेरेरा यांच्यापोटी कर्नाटकात करिअप्पा यांचा जन्म. त्यांनी पश्‍चिम सीमेवर १९४७ मधील भारत-पाकिस्तान युद्धात लष्कराचे नेतृत्व केले होते.
 • जानेवारी १९७३ : सॅम माणेकशॉ भारताचे पहिले फिल्ड मार्शल.
 • १४ जानेवारी १९८६ : कोंडेरेरा करिअप्पा दुसरे फिल्ड मार्शल.

Indian Army Day : भारतीय सैन्याबाबत 'या' गोष्टी माहितीये का?

लष्कर दिन का? 
लष्करातील जवानांची निरपेक्ष सेवा, बंधुता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देशाप्रतीचे प्रेम यांच्या सन्मानार्थ लष्कर दिन साजरा होतो. जगातील महासत्तांशी स्पर्धेची क्षमता भारतीय लष्करात आहे.

‘सर्व्हिस बिफोर सेल्फ’
भारतीय लष्कराचे हे बोधवाक्‍य आहे. भारताची राष्ट्रीय सुरक्षितता, त्याचे संरक्षण आणि परकी अतिक्रमणापासून देशाचे संरक्षण, देशाच्या सीमेवर शांतता आणि सौहार्द राखणे याला लष्कराचे प्राधान्य.

गेल्या ४८ तासांत भारतीय लष्कराचे ६ जवान हुतात्मा

खास वैशिष्ट्ये 

 • अतिउंच, अतिशीत, जंगल आणि डोंगरी भागातील लढाईत भारतीय लष्कर जगात सर्वाधिक निपुण.
 • २०१३ : लष्कराने पूरग्रस्त नागरिकांना वाचविण्यासाठी ‘ऑपरेशन राहत’ राबविले. ते जगातले सर्वांत मोठे आणि व्यापक बचावकार्य होते.
 • १९८२ : लडाखमध्ये जगातील सर्वांत उंचीवर लष्कराने साकारला बेले पूल.
 • उंचीवरची युद्धभूमी : समुद्रसपाटीपासून पाच हजार मीटरवर जगातील सर्वांत उंच युद्धभूमी आहे, तिचे नाव सियाचीन. भारताच्या या भूमीचे रक्षण लष्कर चोखपणे करीत आहे. 
 • घोडदळ : जगातील फक्त तीनच देशांच्या लष्कराकडे घोडदळ आहे, त्यात भारताचा समावेश होतो.
 • संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांततासेनेत भारतीय लष्कराचा सहभाग : सायप्रस, लेबनॉन, काँगो, अंगोला, कंबोडिया, व्हिएतनाम, नामिबिया, एलसाल्वाडोर, लायबेरिया, मोझांबिक, दक्षिण सुदाम आणि सोमालिया येथे कार्य.
 • शांततेच्या काळात लष्कराने ऑपरेशन ब्रासट्रॅक आणि शूरवीर हे युद्ध सराव.
 • संघर्ष, कामगिरी : कारगिल युद्ध, सियाचीन संघर्ष, चोला संघर्ष, गोवा, दादरा आणि नगर हवेली यांची मुक्तता, भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन युद्ध यात भारतीय लष्कराने भरीव आणि विजयी कामगिरी बजावली.
 • यशस्वी ऑपरेशन्स : विजय, मेघदूत आणि कॅकटस.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brilliant performance of Indian Army