पाच महिन्यांनंतर काश्‍मीरमध्ये एसएमएस सेवा पूर्ववत 

वृत्तसंस्था
बुधवार, 1 जानेवारी 2020

सरकारी मालकीच्या सर्वच रुग्णालयांमधील इंटरनेट सेवादेखील पूर्ववत करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारचे प्रवक्ते रोहित कन्साल यांनी दिली. नववर्षाच्या सुरवातीलाच सरकारने ही भेट दिली आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले असून, येथील मोबाईल एसएमएस सेवा आज (1 जानेवारी) मध्यरात्रीपासून पूर्ववत करण्यात आली आहे. पाच महिन्यांनंतर सरकारी रुग्णालयांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट सेवाही सुरु झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारी मालकीच्या सर्वच रुग्णालयांमधील इंटरनेट सेवादेखील पूर्ववत करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारचे प्रवक्ते रोहित कन्साल यांनी दिली. नववर्षाच्या सुरवातीलाच सरकारने ही भेट दिली आहे. 5 ऑगस्टपासून या भागातील सेवांवर सरकारने बंधने घातली होती. 

#HappyNew2020 : जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत

दरम्यान, केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम रद्द केल्यानंतर राज्यामध्ये आणीबाणीसदृश स्थिती निर्माण झाली होती. राज्यामध्ये पुन्हा आंदोलनाचा आगडोंब उसळू नये म्हणून संवेदनशील भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती, तर इंटरनेट आणि दूरध्वनी सेवेलाही ब्रेक लावण्यात आला होता. आता सेवा पूर्ववत झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Broadband Internet In Government Hospitals And Sms Services Restores In Kashmir