Dr Manohar Singh
Dr Manohar Singh Team eSakal

CM चन्नींचा भाऊ लढणार अपक्ष; उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. मनोहर सिंग यांनी आज आपला निवडणूक अर्ज दाखल केला.
Published on

पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Punjab Assembly Elections 2022) तोंडावर आलेल्या असताना सत्ताधारी पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी वाढत चाललेली दिसतेय. सिद्धूंसोबत सुरू झालेल्या गंभीर आरोपांनंतर आता मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांना देखील कुटुंबातूनच अडचणी येणार असल्याचं दिसतंय. चरणजितसिंग चन्नी यांचे बंधू डॉ. मनोहर सिंग यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चन्नी यांचे धाकटे बंधू डॉ. मनोहर सिंग (Manohar Singh) यांनी बस्सी पठाना मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.

Dr Manohar Singh
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणः आरोपींना 6 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

काँग्रेसच्या 'एक कुटुंब, एक तिकीट’ या निर्णयामुळे चन्नींचे (Charanjit Singh Channi) बंधू मनोहर सिंह यांचा तिकिटाचा दावा फेटाळण्यात आला होता. बस्सी पठाणा पंजाबच्या पुआध सांस्कृतिक प्रदेशात येतो आणि चन्नी आणि कुटुंबाचा गड म्हणून ओळखला जातो. काँग्रेसच्या यादीत चन्नींच्या भावाचं नाव आलं नसल्याने ते अपक्ष लढणार असल्याची चर्चा सुरू होती.

Dr Manohar Singh
सिद्धूवर बहिणीचा गंभीर आरोप: म्हणाल्या, संपत्तीवर कब्जा करून...

दरम्यान, पंजाबमध्ये निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून, 1 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. या अर्जांची छाननी 2 फेब्रुवारीला होणार असून 4 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना माघार घेता येईल. तर नव्या निर्णयानुसार २० फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com