काश्मीरमध्ये 1 पाकिस्तानी घुसखोर पकडला, 1 ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

अखनूर सेक्टरमध्ये परागवल येथे आणखी एका घुसखोराला मारण्यात आले. 

श्रीनगर- आंतरराष्ट्रीय सीमेवर संयास्पद हालचाली करणाऱ्या एका पाकिस्तानी घुसखोराला सीमा सुरक्षा बलाच्या (BSF) जवानांनी आज (शुक्रवार) पकडले. तसेच, दुसऱ्या ठिकाणी एका घुसखोराला मारण्यात आले. 

जम्मू-काश्मीरमधील कठुआ सेक्टर येथील सीमेवर BSFने ही कारवाई केली. येथील कुंपणानजीक गस्तीसाठी असलेल्या BSFच्या चौकीजवळच संशयास्पद हालचाली होत असल्याचे लक्षात आल्याने गस्तीवरील जवानांनी घुसखोराला हटकले. 

अझर असे पकडण्यात आलेल्या 30 वर्षीय पाकिस्तानी नागरिकाचे नाव आहे. त्याचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचे दिसून आले. 
दरम्यान, अखनूर सेक्टरमध्ये परागवल येथे आणखी एका घुसखोराला मारण्यात आले. 
 

Web Title: BSF apprehends Pak intruder in Kathua, kills another in Paragwal