esakal | भारतात घुसखोरी करणाऱ्या चीनी नागरिकाला अटक; 1300 सिम कार्ड पाठवले मायदेशी
sakal

बोलून बातमी शोधा

भारतात घुसखोरी करणाऱ्या चीनी नागरिकाला अटक; 1300 सिम कार्ड पाठवले मायदेशी

भारतात घुसखोरी करणाऱ्या चीनी नागरिकाला अटक; 1300 सिम कार्ड पाठवले मायदेशी

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : एका चीनी घुसखोराला भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करताना पकडण्यात आलं आहे. गुरुवारी कोलकातापासून जवळपास 500 किलोमीटर उत्तरमध्ये मालदा जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेच्या माध्यमातून भारतात घुसण्यास तो यशस्वी झाला होता. त्याचवेळी BSF ने त्याला पाहिल. तेंव्हा सैनिकांनी त्याला इशारा दिला तेंव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला पकडण्यात यश आलं आणि त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली.

हेही वाचा: 16 जूनला मोर्चा नाही तर मूक आंदोलन; संभाजीराजे छत्रपती

बॉर्डर सिक्योरिटी फोर्सकडून अटक करण्यात आलेल्या या चीनी नागरिकाने गुरुवारी चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांना अशी माहिती दिली आहे की, त्याने गेल्या दोन वर्षांमध्ये कमीतकमी 1,300 भारतीय सिम कार्ड्स चीनला पाठवले आहेत. या दरम्यानच, UP पोलिसमधील ATS च्या चार सदस्यीय टीमने शुक्रवारी सकाळी पश्चिम बंगालच्या मालदामध्ये आरोपींचा तपाससाठी पोहोचली. हिंदूस्तान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी हुबेईचा रहिवासी असून हान जुनवे असं त्याचं नाव आहे. BSF ने चौकशीमध्ये खुलासा केला आहे की, त्याचा बिझनेस पार्टनर सुन जियांगला UP ATS ने अलिकडेच अटक केली आहे.

हेही वाचा: मुकुल रॉय घरवापसी करणार? भाजपा नेता भेटणार ममता बॅनर्जींना

बीएसएफचे DIG ने एस एस गुलेरिया यांनी म्हटलंय की, तपास अद्याप सुरु आहे. आम्ही हे शोधण्याच्या प्रयत्नात आहोत की, तो भारतविरोधी कोणत्या गुप्तचर एजन्सीसाठी अथवा संघटनेसाठी काम करत होता का? अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून एक लॅपटॉप, दोन आयफोन, एक बांग्लादेशी सिम कार्ड, दोन पेन ड्राईव्ह, ATM कार्ड, अमेरिकन डॉलर सहित काही बांग्लादेशी आणि भारतीय करन्सी जप्त केली आहे.

गुलेरिया यांनी म्हटलं की, चौकशी दरम्यान त्याने म्हटलं की तो गुरुग्राममध्ये स्टार स्प्रिंग नावाच्या एका हॉटेलचा मालक आहे आणि तो 2010 पासून कमीतकमी चारवेळा भारतात आला आहे. आम्ही त्याने दिलेल्या या माहितीची तपासणी करत आहोत. जेंव्हा जियांगला अटक केली गेली तेंव्हा त्याने अवैध गोष्टींच्या संदर्भात जुनवे आणि त्याची पत्नीच्या नावांचा उल्लेख केला. त्यानंतर ATS ने जुनवे आणि त्याच्या पत्नीच्या विरोधात लखनऊमध्ये गुन्हा दाखल केला आहे, ज्यामुळे त्याला भारतीय विजा मिळाला नाहीये. जुनवेने मग नेपाळ आणि बांग्लाेदशकडून विजा घेतला आणि भारतात प्रवेश केला. त्यांनी पुढे म्हटलंय की, तपास सुरु आहे आणि इतर गुप्तचर एजन्सींना सतर्क करण्यात आलं आहे. आम्ही या प्रकरणावर काम करत आहोत, त्याच्या लॅपटॉपला स्कॅन केलं जात आहे.