esakal | मुकुल रॉय घरवापसी करणार? भाजपा नेता भेटणार ममता बॅनर्जींना
sakal

बोलून बातमी शोधा

mukul-roy

मुकुल रॉय घरवापसी करणार? भाजपा नेता भेटणार ममता बॅनर्जींना

sakal_logo
By
दीनानाथ परब

कोलकात्ता: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सत्ता कायम राखल्यानंतर तिथे राजकारण बदललं आहे. तृणमुल काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये गेलेले नेते पुन्हा घरवापसी करण्याच्या विचारामध्ये आहेत. भाजपाचे नेते मुकुल रॉय (Mukul Roy) आज तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकात्ता येथे भेट घेणार आहेत. (Ghar-wapsi for Mukul Roy? BJP leader to meet TMC supremo Mamata Banerjee)

मुकुल रॉय यांच्यासोबत त्यांचा मुलगाही ममता बॅनर्जींची भेट घेईल. अलीकडेच मुकुल रॉय यांच्या मुलाने ममता बॅनर्जी आणि त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांची स्तुती केली होती. मुकुल रॉय पुन्हा तृणमुलमध्ये प्रवेश करु शकतात, अशी चर्चा असताता दोन्ही नेत्यांची भेट होत आहे. त्यामुळे आजच्या भेटीचे वेगळे महत्त्व आहे. भाजपा आणि तृणमुल या दोन्ही पक्षांनी या बद्दल मौन बाळगले आहे.

हेही वाचा: विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलंत तर... -आशिष शेलार

बुधवारी संध्याकाळी तृणमुल खासदार सौगाता रॉय यांनी मुकुल रॉय हे पुन्हा तृणमुलमध्ये प्रवेश करु शकतात, असे संकेत दिले होते. मुकुल रॉय हे एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून ओळखले जायचे. त्यांनी २०१७ मध्ये टीएमसी सोडली व भाजपात प्रवेश केला होता.