गोळीबारात जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 23 ऑक्टोबर 2016

पाकिस्तानी सैन्याने शुक्रवारी रात्री शस्त्रसंधीचा भंग करत जोरदार गोळीबार केला होता. या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलातर्फे (बीएसएफ) जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते. त्यात पाकिस्तानचे सात रेंजर्स आणि एक दहशतवादी ठार झाले; तर "बीएसएफ‘चे जवान गुरनामसिंग जखमी झाले होते.

जम्मू - जम्मू आणि काश्‍मीरमधील कथुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात जखमी झालेला भारतीय जवान गुरनामसिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

पाकिस्तानी सैन्याने शुक्रवारी रात्री शस्त्रसंधीचा भंग करत जोरदार गोळीबार केला होता. या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलातर्फे (बीएसएफ) जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते. त्यात पाकिस्तानचे सात रेंजर्स आणि एक दहशतवादी ठार झाले; तर "बीएसएफ‘चे जवान गुरनामसिंग जखमी झाले होते. जखमी झालेल्या गुरनामसिंग यांना जम्मूतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, शनिवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

गुरनामसिंगचे वडील कुलबीरसिंग म्हणाले, की माझी मोदी सरकारकडे मागणी आहे आपण युद्ध केले पाहिजे. माझ्या मुलाने देशासाठी प्राणांची आहुती दिलीय, आम्ही दुःखी नाही, आनंदी आहोत.

Web Title: BSF constable Gurnam Singh, injured in cross-border firing by Pakistan, dies