पेट्रोल पंपाच्या नावाखाली महिलेला गंडा, BSF जवानाचा धक्कादायक कारनामा उघडकीस; विवाहित असूनही ठेवले होते प्रेमसंबंध
BSF jawan arrested in Kolkata for fraud : पैसे घेतल्यानंतर गौतम हलदर फरार झाला. त्याच्या पत्नीने पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्याचबरोबर बीएसएफनेही त्याचा शोध सुरू केला होता.
BSF Jawan Fraud : पश्चिम बंगालमधील गरियाहाट पोलिसांनी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) एका जवानाला अटक केली आहे. त्याच्यावर एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पेट्रोल पंप सुरू करण्याच्या नावाखाली तब्बल २९ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.