पाकच्या गोळीबारात बीएसएफचा जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जानेवारी 2018

आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने बुधवारी रात्री जोरदार गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान हुतात्मा झाला असून, एक जवान जखमी आहे. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मू - जम्मू काश्मीरमधील आर एस पुरा सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने बुधवारी रात्री जोरदार गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान हुतात्मा झाला असून, एक जवान जखमी आहे. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानी सैन्याकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करून होत असलेल्या गोळीबाराला भारताकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे. नुकतेच बीएसएफच्या जवानांनी सीमा पार जात सात पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला होता. बुधवारी रात्री नऊपासून पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात येत होता. अरनिया सेक्टरमध्येही सीमेवरील गावांवर गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये अनेक घरांचे नुकसान झाले आहे.

Web Title: BSF Jawan Killed in Ceasefire Violation by Pakistani Troops in Jammu