Laal Pham: पाकिस्तानी स्नायपरची गोळी लागून बीएसएफ जवानाचा मृत्यू ; लष्कराच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून धाडसाचे कौतुक

BSF Jawan Martyred: पाकिस्तान स्नायपरने गुरुवारी रात्री केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा जवान हुतात्मा झाला. हेड कॉन्स्टेबल लाल फाम किमा (वय ५०) असे त्यांचे नाव आहे.
Laal Pham: पाकिस्तानी स्नायपरची गोळी लागून बीएसएफ जवानाचा  मृत्यू ; लष्कराच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून धाडसाचे कौतुक

BSF Jawan Martyred: पाकिस्तान स्नायपरने गुरुवारी रात्री केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा जवान हुतात्मा झाला. हेड कॉन्स्टेबल लाल फाम किमा (वय ५०) असे त्यांचे नाव आहे. ते एक धाडसी जवान म्हणून ओेळखले जात.

जम्मू-काश्‍मीरमधील नियंत्रण रेषेजवळ १९९८मधील दहशतवादविरोधी अभियानाच्या वेळी त्यांनी अनेक सहकाऱ्यांचा जीव वाचविला होता. तत्कालीन कमांडिंग ऑफिसरने त्यांच्या धाडसाची आठवण करणारी एक भावनात्मक पोस्टही केली.

१९९८ च्या थंडीच्या दिवसात एका अभियानात गुल गावातील एका मातीच्या घरात लपलेल्या एका दहशतवाद्याला ठार करण्यापूर्वी ‘तुम साला पिन निकालेगा’ असे म्हणत लाल फाम किमा ओरडला होता. त्यामुळे दहशतवाद्याची माहिती इतर जवानांना कळाली होती. हे गाव भारत आणि पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ पीरपंजालच्या रांगात वरच्या बाजूला आहे.

या अभियानाची आठवण काढत किमा यांचे तत्कालिन कमांडिंग ऑफिसर (सीओ) यांनी भावनात्मक पोस्ट केली आणि ती पोस्ट सोशल मीडियावर अनेक सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी शेअर केली. किमा हे काल भारत आणि पाकिस्तान सीमेवर कर्तव्यावर असताना जम्मूच्या रामगड सेक्टरवर सीमेपलीकडून पाकिस्तानच्या स्नायपरची गोळी लागली आणि त्यात त्यांना वीरमरण आले.(Latest Marathi News)

Laal Pham: पाकिस्तानी स्नायपरची गोळी लागून बीएसएफ जवानाचा  मृत्यू ; लष्कराच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून धाडसाचे कौतुक
Rajasthan Election 2023: राजस्थानात बंडखोरांमुळे काँग्रेस-भाजपची कोंडी; तब्बल १८७५ उमेदवार रिंगणात

ऐजॉलचे रहिवासी हेड कॉन्स्टेबल लाल फाम किमा हे १९९६ मध्ये सीमा सुरक्षा दलात सामील झाले होते आणि सध्या ते १४८ व्या तुकडीत होते. हुतात्मा लाल किमा यांच्याबद्दल लिहिताना निवृत्त सुखमिंदर यांनी म्हटले, ‘‘जेव्हा तुमच्या हौतात्म्याची बातमी कळाली तेव्हा डोकं सुन्न झाले. हा तोच आहे का? की ज्याने आंतरराष्ट्रीय सीमेवर एका अभियानाच्या वेळी आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचविले.’’

लाल किमा यांनी २५ वर्ष सीमा सुरक्षा दलात सेवा केली आणि त्यांचे धाडस, शौर्य हे अधिकाऱ्यांनी आणि सहकारी जवानांनी अनुभवले आहे. त्यांना सहावेळा शौर्य पुरस्कार मिळाला आहे. किमा यांचे पार्थिव त्यांचे राज्य मिझोराम येथे पाठविण्यापूर्वी जम्मूत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे.(Latest Marathi News)

Laal Pham: पाकिस्तानी स्नायपरची गोळी लागून बीएसएफ जवानाचा  मृत्यू ; लष्कराच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून धाडसाचे कौतुक
LIVE Marathi News : पुणे-नगर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी! दिवाळीच्या सुट्टीला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका

काय घडले होते १९९८मध्ये?

नियंत्रण रेषेजवळ काही दहशतवादी एका मातीच्या घरात लपले होते. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी घराला घेराव घातल्याचे समजल्यानंतर त्यांनी गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले केले. मात्र हाती काहीच लागत नसल्याचे पाहून त्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करण्यासाठी स्वत:ला उडवून दिले. यानंतर ढासळलेल्या घरातून धुर निघू लागला आणि तेथे सीमा सुरक्षा दलाचे जवान पोचले.

घराची झडती घेताना तीन दहशतवाद्यांचे मृतदेह आढळून आले. पण त्यापैकी एक जिवंत होता आणि हेच लाल फाम किमा यांनी हेरले. त्यावेळी अचानक जोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला. ‘तुम साला पिन निकालेगा!! यानंतर त्यांच्या हलक्या वजनाच्या रायफलमधून प्रचंड गोळीबार झाला. हा गोळीबार पाहून जवान पुन्हा सुरक्षित ठिकाणी गेले.

दहशतवादी मृत झाल्याचे समजून हे जवान जवळ जात होते. पण त्यांना सजग केले आणि तेथून निघून जाण्यास प्रवृत्त केले. लाल किमा यांनी जिवंत असलेल्या एका दहशतवाद्याला पिन काढताना पाहिले आणि तो शेवटचे श्‍वास घेऊ लागला होता. त्याने ग्रेनेड फेकला पण जवान मात्र सुरक्षित ठिकाणी होते. हा दहशतवादी यशस्वी झाला असता तर नक्कीच दहा ते बारा जणांना हौतात्म्य आले असते. (Latest Marathi News)

Laal Pham: पाकिस्तानी स्नायपरची गोळी लागून बीएसएफ जवानाचा  मृत्यू ; लष्कराच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून धाडसाचे कौतुक
Land For Job Scam: लँड फॉर जॉब स्कॅममध्ये ईडीची मोठी कारवाई; लालूंच्या जवळचा उद्योगपती अमित कात्यालला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com