'मग 'त्यां'ना सीमेवर का पाठविले'

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

त्यांची मानसिक स्थिती योग्य नाही. तर, त्यांनी सीमेवर तैनात कशासाठी करण्यात आले. चांगल्या जेवणाची मागणी करण्यात चूक काय आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या पतीने जे काही केले, ते योग्यच केले आणि तेच सत्य आहे.

नवी दिल्ली - फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करून लष्करी जवानांना मिळत असलेल्या अन्नाचा पंचनामा करणाऱ्या बीएसएफ जवानाची मानसिकस्थिती ठीक नसल्याचे सांगणाऱ्यांना जवानाच्या पत्नीने प्रत्युत्तर देत मग त्यांनी रक्षणासाठी सीमेवर का पाठविले असा प्रश्न केला.

जम्मू-काश्मीरमधील सीमेवर तैनात असलेला बीएसएफ जवान तेज बहादूर यादव याने एक व्हिडिओ पोस्ट करुन देशभर खळबळ उडवून दिली. या जवानाने थेट लष्करी अधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर या जवानाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगण्यात आले होते. तर, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आता या जवानाच्या समर्थनार्थ त्याचे कुटुंबीयही उतरले आहेत.

यादव यांची पत्नी शर्मिला यांनी सांगितले, की त्यांची मानसिक स्थिती योग्य नाही. तर, त्यांनी सीमेवर तैनात कशासाठी करण्यात आले. चांगल्या जेवणाची मागणी करण्यात चूक काय आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या पतीने जे काही केले, ते योग्यच केले आणि तेच सत्य आहे. व्हिडिओ टाकल्यापासून माझे पतीबरोबर बोलणे होऊ शकलेले नाही. 

यादव यांचा मुलगा रोहित यानेही या प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी केली आहे. तसेच चांगल्या खाण्याची मागणी करण्यात चूक काय आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. डिसेंबरमध्ये तेज बहादूर जेव्हा घरी आला होता, तेव्हाच त्याने तेथे जेवण मिळत नसल्याचे सांगितले होते आणि तेथे राहू शकत नाही, असे सांगितल्याचे जवानाच्या वडीलांनी सांगितले.

Web Title: bsf jawan tej bahadur wife says if my husband was not mentally stable why was he at border