फिरोजपुरमध्ये सापडली पाकिस्तानी बोट; जवळच अडकला होता PM मोदींचा ताफा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ferozepur
फिरोजपुरमध्ये सापडली पाकिस्तानी बोट; जवळच अडकला होता PM मोदींचा ताफा

फिरोजपुरमध्ये सापडली पाकिस्तानी बोट; जवळच अडकला होता PM मोदींचा ताफा

सीमा सुरक्षा दलाने (BSF) शुक्रवारी बेपत्ता बोट ताब्यात घेतली आहे. पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील सीमा चौकीजवळ ही पाकिस्तानी बोट आढळून आली आहे. फिरोजपुर हा अत्यंत संवेदनशील जिल्हा असून, फिरोजपूरला लागूनच पाकिस्तानची सीमारेषा आहे. बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आंतरराष्ट्रीय सीमेवरील डीटी मॉल बॉर्डर चौकीजवळ गस्तीदरम्यान 136 बटालियनच्या जवानांना लाकडी बोट सापडली होती, त्यानंतर ही बोट ताब्यात (BSF seizes Pakistani boat) घेतली आहे.

हेही वाचा: 'सत्तेच्या भुकेसाठी मोदींनी पुलवामा घटना घडवून आणली'

नोव्हेंबरमध्येही भारत-पाक सीमेवरील एका गावातून पोलिसांनी टिफिन बॉम्ब जप्त केले होते. त्याठिकाणी पोलिसांना हँडग्रेनेडही सापडले होते. आता सीमा सुरक्षा दलाने फिरोजपूरमधील सतलज नदीतून पाकिस्तानी बोट जप्त केली आहे. रिकव्हरीच्या वेळी बोट रिकामी होती. सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. ही बोट याठिकाणी कधी आली, त्यात कोण कोण होतं आणि ती इथे आणण्यामागचा हेतू काय होता, याचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा: 'सत्तेच्या भुकेसाठी मोदींनी पुलवामा घटना घडवून आणली'

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा फिरोजपुरमध्ये ज्या ठिकाणी अडकला होता, त्याठिकाणहुन अगदी काही किमी अंतरावरच ही बोट आढळून आली आहे. मात्र या दोन्ही घटनांचा संबंध असल्यासंदर्भातील कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra ModiBSF
loading image
go to top