सत्तेच्या भुकेसाठी मोदींनी पुलवामा घटना घडवून आणली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप I Narendra Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi

'पीएम मोदींच्या सुरक्षेच्या नावाखाली ढोंगी आणि पुजाऱ्यांचं दुकान आता सुरू झालंय.'

'सत्तेच्या भुकेसाठी मोदींनी पुलवामा घटना घडवून आणली'

नवी दिल्ली : काँग्रेस नेते उदित राज (Congress Leader Udit Raj) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत वादग्रस्त ट्विट केलंय. सत्तेच्या भूकेसाठी पंतप्रधान मोदींनी पुलवामा घटना घडवून आणल्याचं ट्विट उदित यांनी केलंय. यावर भाजपनं उदित यांना चोख प्रत्युत्तरही दिलंय.

काँग्रेस नेते उदित राज यांनी ट्विट केलंय की, पीएम मोदींच्या सुरक्षेच्या (PM Narendra Modi Security Breach) नावाखाली ढोंगी आणि पुजाऱ्यांचं दुकान आता सुरू झालंय. पंतप्रधान मोदींच्या नौटंकीमुळं आता स्पष्ट झालीय की, सत्तेच्या भुकेसाठी पुलवामा घटना स्वतःच घडवून आणली गेलीय, याला जबाबदार कोण?

हेही वाचा: 'मी त्याला स्पष्ट सांगितलंय, तू उद्यापासून…'; भावावर ममता बॅनर्जी भडकल्या

आपल्या वादग्रस्त ट्विटवर उदित राज यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटलंय की, फिरोजपूरमध्ये जे काही घडलंय, त्यालाच नौटंकी म्हटलंय. कारण, पीएम मोदींवर कोणीही गोळीबार किंवा दगडफेक केली नाही, मग मी वाचलो असं ते का म्हणाले? विनाकारण या प्रकरणावरुन पंजाब सरकारला जबाबदार धरलं जातंय, हा मोदींचा नौटंकीपणा नाहीतर काय आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

भाजपकडून उदित यांना जोरदार 'प्रत्युत्तर'

काँग्रेस नेते उदित राज यांच्यावर प्रहार करताना भाजपचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया (Gaurav Bhatia) म्हणाले, काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या (Sonia Gandhi) सांगण्यावरून अशी विधानं राज करत आहेत. मी असंही म्हणू शकतो, की राहुल गांधी (Rahul Gandhi) चीनमधून पैसे घेतात. सोनिया गांधींना पाकिस्तानातून लोकशाही कमकुवत करण्याच्या सूचना मिळतात, पण पुराव्याशिवाय आम्ही कोणावरही निराधार आरोप करत नाही. उदित राज भाजपमध्ये असताना काँग्रेसवर आरोप करायचे, आता काँग्रेसमध्ये गेले तर भाजपवर आरोप करत आहेत, असा घणाघातही त्यांनी केलाय.

हेही वाचा: पाकिस्तानच्या कर्णधाराची ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाला 'मॅच फिक्सिंग'ची ऑफर

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top