सांबा : दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळला

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

गुरुवारी पुँच जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या ठिकाणावर छापा टाकून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

जम्मू - जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री आंतरराष्ट्रीय सीमेवरून (आयबी) भारतीय हद्दीत प्रवेश घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा कट जवानांनी उधळून लावला.

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सांबा जिल्ह्यातील तरणा नाला येथे आंतरराष्ट्रीय सीमेवरून 4 ते 6 दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. घुसखोरी होत असल्याचे दिसताच बीएसएफच्या जवानांकडून गोळीबार करण्यात आला. त्यामुळे दहशतवादी माघारी पळून जाण्यात यशस्वी झाले.

घुसखोरीचा हा कट उधळून लावल्याने परिसरात बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या भागात जवानांनी जाऊन शोधमोहिम केली. त्यापूर्वी गुरुवारी पुँच जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या ठिकाणावर छापा टाकून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

Web Title: BSF troops foil infiltration bid along IB in Samba district of J-K