आमची आघाडी मोदी, शहांची झोप उडवणारी : मायावती

वृत्तसंस्था
शनिवार, 12 जानेवारी 2019

म्हणून काँग्रेस आघाडीत नाही 
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे सत्ता काँग्रेसच्या हातात सत्ता होती. काँग्रेसच्या काळातही भ्रष्टाचार, गरिबी वाढली. म्हणून बसप आणि सपच्या आघाडीत काँग्रेसला स्थान दिले नाही. त्यांच्याबरोबर आघाडी केल्याने आम्हाला काही लाभ होणार नाही. आम्हाला काँग्रेस आघाडीत आल्याने लाभ होत नाही, त्यामुळे आमच्या मत टक्केवारी होतो. काँग्रेसला सोबत घेतले तरी नेहमी धोका होतो.

लखनौ : केंद्राच्या हुकमी आणि अहंकारी कारभारामुळे बहुजन समाज पक्ष (बसप) आणि समाजवादी पक्षाची (सप) आघाडी झाली आहे. आघाडीमुळे उत्तर प्रदेशातील जनतेला आमच्याकडून खूप अपेक्षा असून, 38-38 जागांवर आम्ही लढणार आहोत. आमची आघाडी मोदी, शहांची झोप उडवणारी असेल, असा इशारा बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी दिला.

लोकसभेसाठी जागावाटपाबाबत चर्चा झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेऊन आघाडीबाबत निर्णय जाहीर केला. लोकसभा निवडणुकीत भाजपला सामोरे जाण्यासाठी एकत्र येऊन लढण्याबाबत अखिलेश यादव आणि मायावती यांच्यात नुकतीच दिल्लीत चर्चा झाली होती. यामध्ये जागावाटपाबाबत चर्चा झाल्याचे समजते. आघाडी करण्यासाठी दोन्ही पक्षांनी अनुकूलता दर्शविल्यानंतर प्रथमच त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या आघाडीतून कॉंग्रेसला पूर्णपणे वगळले आहे.

मायावती म्हणाल्या, की आमच्या पत्रकार परिषदेने सत्ताधाऱ्यांची झोप उडाली आहे. भाजपसारख्या जातीयवादी आणि सांप्रदायिक शक्तींना हरविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. गरिब, शेतकरी, उद्योजक हैराण आहेत. आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने एक राजकीय क्रांती असेल. नोटबंदी, जीएसटीसारख्या निर्णयांमुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडली. 2019 हे वर्ष राजकीय क्रांती घडविणारे असेल.

म्हणून काँग्रेस आघाडीत नाही 
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे सत्ता काँग्रेसच्या हातात सत्ता होती. काँग्रेसच्या काळातही भ्रष्टाचार, गरिबी वाढली. म्हणून बसप आणि सपच्या आघाडीत काँग्रेसला स्थान दिले नाही. त्यांच्याबरोबर आघाडी केल्याने आम्हाला काही लाभ होणार नाही. आम्हाला काँग्रेस आघाडीत आल्याने लाभ होत नाही, त्यामुळे आमच्या मत टक्केवारीत घट होते. काँग्रेसला सोबत घेतले तरी नेहमी धोका होतो. अमेठी आणि रायबरेली आम्ही काँग्रेससाठी सोडली असून, दोन जागा मित्र पक्षांना देणार आहे.

Web Title: BSP Chief Mayawati and Samajwadi Party Chief Akhilesh Yadav address a joint press briefing in Lucknow