उत्तराखंडमध्ये खाते उघडणार; बसपला विश्वास

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

डेहराडून : उत्तराखंडमधील जनता भाजप व कॉंग्रेसला कंटाळली असून, ती नवीन पर्यायाच्या शोधात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फायदा बहुजन समाजवादी पक्षाला (बसप) होईल व पक्षाचे अनेक उमेदवार निवडून येतील, असा विश्वास पक्षाचे राज्यप्रमुख सत्या नरेन सचन यांनी व्यक्त केला.

सचन म्हणाले, ""या वेळी आम्ही विधानसभेत प्रवेश करू, असा विश्वास आम्हाला आहे. कॉंग्रेस व भाजपने येथे भ्रष्टाचार व प्रांतवादाला खतपाणी घालून येथील जनतेला निराश केले आहे. दोन्ही पक्षांविषयी जनतेत असंतोष असून, ती या निवडणूक आम्हाला संधी देईल.'' दरम्यान, बसपने रविवारी 26 उमेदवारांची नावे जाहीर केली असून, एकूण 50 जागांवरून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: bsp confident to debut in uttarakhand