esakal | राजस्थानच्या राजकीयनाट्यात बसपाची उडी; काँग्रेसविरोधात न्यायालयात जाणार

बोलून बातमी शोधा

bsp and congress.jpg

राज्य बहुजन समाज पक्ष (BSP) काँग्रेसला न्यायालयात खेचण्याची शक्यता आहे. बसपाचे 6 आमदार काँग्रेसमध्ये  प्रवेश केल्याप्रकरणी काँग्रेसला न्यायालयात आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

राजस्थानच्या राजकीयनाट्यात बसपाची उडी; काँग्रेसविरोधात न्यायालयात जाणार
sakal_logo
By
कार्तिक पुजारी

जयपूर- राजस्थानमध्ये काँग्रेससमोरील अडचणी वाढत असल्याचं दिसत आहे. सचिन पायलट यांना पक्षातून हाकालण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत राज्यात आपली सत्ता वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. यातच राज्य बहुजन समाज पक्ष (BSP) काँग्रेसला न्यायालयात खेचण्याची शक्यता आहे. बसपाचे 6 आमदार काँग्रेसमध्ये  प्रवेश केल्याप्रकरणी काँग्रेसला न्यायालयात आव्हान मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी उशिरापर्यंत याबाबतचा निर्णय येण्याची शक्यता आहे. 

पक्षाचे दरवाजे तुमच्यासाठी अजूनही खुले; काँग्रेसने दिली परतीची साद
राज्यसभा निवडणुकीच्या वेळी बसपाने निवडणूक आयोगाला याबाबतची माहिती दिली होती. पक्षाने आमदारांना व्हिपनुसार मत टाकण्याचे आदेश दिले होते. निवडणूक आयोगाने याप्रकरणी दखल घेण्यास नकार दिला होता. बसपने याबाबत विधानसभा अध्यक्षांना हस्तक्षेप करण्याचीही मागणी केली आहे.

प्रकरण काय आहे?

राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारला बसपाच्या 6 आमदारांनी समर्थन दिलं होतं. मात्र, सप्टेंबरमध्ये अशोक गेहलोत यांनी या 6 आमदारांना काँग्रेसमध्ये घेतले होते. त्यानंतर या आमदारांनी जानेवारीमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटून पक्षाचे औपचारिक सदस्यत्व घेतलं होतं. यावरुन बसपाने काँग्रेसवर टीका केली होती. बसपा प्रमुख मायावती यांनी अशोक गेहलोत यांचा राजीनामा देखील मागितला होता. बसपा हाच मुद्दा घेऊन निवडणूक आयोगाकडे गेली होती, पण आयोगाने याची दखल घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता न्यायालयात जाण्याचा बसपाकडे पर्याय आहे.

भारत आणि अमेरिकेनंतर आता ब्रिटननेही दिला चीनला दणका
गेहलोत यांची राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी हालचाल सुरु आहे. पायलट यांच्या विद्रोहाने त्यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्षापासून हटवण्यात आलं आहे. पायलट यांनी आपल्याकडे 30 आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यांच्याकडे 15 ते 16 आमदारांचे समर्थन आहे. त्यामुळे सध्या अशोक गेहलोत यांची स्थिती ठिक आहे, पण तरीही ते पूर्णपणे निर्धास्त नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचं कळत आहे. भविष्यात त्यांना फ्टोर टेस्ट द्यावी लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.