मध्यप्रदेशात काँग्रेसला सत्तेसाठी 'हत्ती'चे बळ

वृत्तसंस्था
बुधवार, 12 डिसेंबर 2018

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आम्ही निवडणुकीत उतरलो होतो. पण, त्यात आम्हाला यश आले नाही. जनतेने काँग्रेसने निवडून दिले आहे. आमचे आणि काँग्रेसचे काही मु्द्द्यांवर मतभेद असले तरी आम्ही त्यांनाच समर्थन देत आहे.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात अवघ्या दोन जागा बहुमतापासून दूर असलेल्या काँग्रेसला बहुजन समाज पक्षाने (बसप) समर्थन देण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. 

आज (बुधवार) याठिकाणी मतमोजणी पूर्ण झाली. काँग्रेसला 114 जागा मिळाल्या असून, भाजपला 109 जागा जिंकता आल्या. अपक्षांना सात जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये बसपच्या 2 आणि समाजवादी पक्षाची एक जागा आहे. तर चार अपक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसला बहुमतासाठी फक्त दोन जागांची आवश्यकता होता. आता बसपने समर्थन दिल्याने काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी सरसावले आहे. बसपच्या अध्यक्षा मायावतींनीच काँग्रेसला समर्थन देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मायावती म्हणाल्या, की भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आम्ही निवडणुकीत उतरलो होतो. पण, त्यात आम्हाला यश आले नाही. जनतेने काँग्रेसने निवडून दिले आहे. आमचे आणि काँग्रेसचे काही मु्द्द्यांवर मतभेद असले तरी आम्ही त्यांनाच समर्थन देत आहे. राजस्थानमध्येही गरज पडली तर आम्ही काँग्रेसलाच पाठिंबा देवू. भाजपच्या कार्यकाळात अनुसुचित जाती-जमातीचे कोणतेही भले झाले नाही.

Web Title: BSP will support Congress in Madhya Pradesh says Mayawati