हृदयद्रावक! गंगा नदीत बुडून MBBSचे पाच विद्यार्थी बुडाले; तिघांचा मृत्यू | budaun 5 mbbs students drowned in ganges 3 dead search operation continue | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

5 mbbs students drowned in ganges

हृदयद्रावक! गंगा नदीत बुडून MBBSचे पाच विद्यार्थी बुडाले; तिघांचा मृत्यू

बदायूं : उत्तर प्रदेशातील बदायूंमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील कचला गंगा घाटावर एमबीबीएसच्या पाच विद्यार्थी बुडाले. यामध्ये तिघांचे मृतदेह सापडले असून २ विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे. हे सर्व विद्यार्थी बदायूं मेडिकल कॉलेजच्या २०१९ च्या बॅचचे आहेत.

हे सर्व जण कचला गंगा घाटावर स्नान करण्यासाठी गेले होते. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. उजनी कोतवाली परिसरातील कचला गंगा घाटात ही घटना घडली.

यामध्ये प्रमोद यादव, प्रकाश मौर्य, पवन यादव, नवीन सिंघल व अंकुश गेहलोत हे स्नान करू लागले. मात्र अचानक ते खोल पाण्यात बुडू लागले. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात येताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावपथकाने तात्काळ नदीतील विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. पण विद्यार्थ्यांना वाचविण्यात अपयश आलं.

कचला गंगा घाटावर पोहोचल्यानंतर डीएम मनोज कुमार यांनी तपासणी करून घटनेची माहिती घेतली आहे. डीएमने सांगितले की, मृतदेह बाहेर काढण्यासाठी एक पथक नेमण्यात आले आहे.

टॅग्स :doctorGanga River