Buddha Pournima 2022 : बुद्ध पौर्णिमेचे चंद्रग्रहण कुठून दिसेल ? पाहा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lunar eclipse

Buddha Pournima 2022 : बुद्ध पौर्णिमेचे चंद्रग्रहण कुठून दिसेल ? पाहा...

मुंबई : वर्षातील पहिले चंद्रग्रहण १६ मे या दिवशी बुद्ध पौर्णिमेला लागणार आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा मानले जाते. पंचांगानुसार १६ मे ला वैशाख पौर्णिमेची तिथी, विशाखा नक्षत्र आणि चंद्र ग्रहण वृश्चिक राशीत लागेल. हे पूर्ण चंद्रग्रहण असेल. या दिवशी बुद्ध पौर्णिमेचे पर्व चंद्रग्रहण परीघ योगामध्ये साजरे केले जाईल.

हेही वाचा: Buddha Purnima 2022 Date : या दिवशी साजरी होणार बुद्ध पौर्णिमा; जाणून घ्या महत्त्व

हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व आहे. बुद्ध पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा आणि चंद्रग्रहणाला नदीत आंघोळ करणे, दान आणि ध्यान या गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.

हेही वाचा: खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही

या वर्षीचे पहिले चंद्रग्रहण कधी ?

या वर्षीचे पहिले चंद्रग्रहण १६ मे २०२२ या दिवशी लागेल. सकाळी ८ वाजून ५९ मिनिटे ते १० वाजून २३ मिनिटे या कालावधीत हे ग्रहण लागेल. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही.

हेही वाचा: बुद्ध पौर्णिमा : बुद्धविचार म्हणजे अहिंसेचा- शांतीचा

सूतककाळ मान्य नाही

हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याचा सूतककाळ मान्य होणार नाही. ग्रहण सुरू होण्याच्या ९ तास आधीपासून त्याचा सूतककाळ सुरू होईल. या काळात कोणतेही चांगले कार्य केले जात नाही.

इथून दिसेल ग्रहण

नैऋत्य युरोप, आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर, हिंदी महासागर येथून हे ग्रहण दिसेल.

Web Title: Buddha Pournima 2022 First Lunar Eclipse Of The Year 2022 Can Be Seen From Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top