Buddha Purnima 2022 Date : या दिवशी साजरी होणार बुद्ध पौर्णिमा; जाणून घ्या महत्त्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

buddha

Buddha Purnima 2022 Date : या दिवशी साजरी होणार बुद्ध पौर्णिमा; जाणून घ्या महत्त्व

मुंबई : वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात. यावर्षी १६ मे या दिवशी बुद्ध पौर्णिमा आहे. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, असे मानले जाते. त्यांच्या जन्मतिथीला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. बौद्ध धर्मियांसाठी हा दिवस एखाद्या सणासारखा असतो.

हेही वाचा: जुन्नरच्या बुद्ध लेण्यांना रशियन पर्यटकांची भेट

हिंदू धर्मातील समजुतीनुसार गौतम बुद्ध हे विष्णूचा नववा अवतार आहेत. त्यामुळे हा दिवस हिंदूंसाठीही महत्त्वाचा आहे. या दिवशी श्रीहरी आणि चंद्राची पूजा केली जाते.

बुद्ध पौर्णिमेच्या व्रताचे महत्त्व

बुद्ध पौर्णिमेचे व्रत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी भल्या पहाटे उठून आंघोळ करून सूर्याला पाणी अर्पण करून व्रताचा संकल्प केला जातो. हे व्रत चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. या दिवशी दानधर्म केल्याने पुण्य लाभते असे मानले जाते.

हेही वाचा: घरीच साजरी झाली बुद्ध पौर्णिमा; फिजिकल डिस्टन्सिंग पाळत अभिवादन 

बुद्ध पौर्णिमेच्या पूजेचा विधी

भल्या पहाटे उठून आंघोळ करून सूर्याला पाणी अर्पण करावे. या दिवशी सूर्याला तिळाचे पाणी अर्पण करणे महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी विष्णूच्या प्रतिमेचे पूजन केले जाते व चंद्रदर्शन पुण्यदायी मानले जाते.

बुद्ध पौर्णिमेचा शुभमुहूर्त

मुहूर्त १५ मे ला दुपारी १२.४५ वाजता सुरू होऊन १६ मे ला ९.४५ पर्यंत राहील.

Web Title: Buddha Pournima 2022 Date Importance

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Buddha
go to top