पेट्रोल, डिझेलच्या दरात 2 रुपयांनी कपात

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेती, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांवर जोर देण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवरून विरोधी पक्ष आणि जनतेतून नाराजी दर्शविण्यात येत होती.

नवी दिल्ली - अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात कपात करण्यात आल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेती, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांवर जोर देण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवरून विरोधी पक्ष आणि जनतेतून नाराजी दर्शविण्यात येत होती. आता सरकारने अर्थसंकल्पातून अबकारी कर कमी करून थोडा दिलासा दिला आहे.

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा प्रती लिटर दर 80 रुपयांपुढे गेला होता. यावरून टीका होत असताना करात कपात केल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 79 रुपये प्रती लिटर झाले असून, दिल्लीत 72.49 रुपये इतका दर झाला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाकडून अबकारी करात कपात करण्याची मागणी होत होती. अखेर अर्थसंकल्पातून ही मागणी पूर्ण करण्यात आली आहे.

Web Title: Budget 2018 Union Budget Arun Jaitly Petrol Diesel prices decreased