अर्थसंकल्पीय अधिवेशनावर संकटाचे ढग, तब्बल 700 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना | Budget Session 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

parliament

अर्थसंकल्पीय अधिवेशनावर संकटाचे ढग, 700 हून अधिक जणांना कोरोना

नवी दिल्ली : ३१ जानेवारीपासून दोन टप्प्यात सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर (budget session 2022) संकटाचे ढग दाटले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (corona third wave) काळात होणाऱ्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संसदेच्या 700 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनावर संकटाचे ढग

सूत्रांच्या माहितीनुसार, 4 जानेवारीपर्यंत संसद संकुलातील 718 कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, ज्यामध्ये 204 कर्मचारी एकट्या राज्यसभा सचिवालयातील आहेत. बाकीचे कर्मचारीही संसदेशीच संलग्न आहेत. दरम्यान, संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून कोरोनाची तिसरी लाट शिगेला पोहोचेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असेल.

पावसाळी अधिवेशन 2020 प्रमाणेच लागणार निर्बंध?

ओमिक्रॉन आणि कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशनही पावसाळी अधिवेशन 2020 सारखी परिस्थिती उद्भवू शकते. सप्टेंबर, 2020 मध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनात कठोर COVID-19 प्रोटोकॉल लागू करण्यात आला. दिवसाच्या पहिल्या भागात राज्यसभेची आणि दुसऱ्या भागात लोकसभेची बैठक होत होती. यानंतर पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन पूर्वनियोजित वेळेनुसार पार पडले. या काळात सोशल डिस्टसिंगचे नियम पाळले गेले. तरीही यावेळी होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी कठोर कोविड-19 प्रोटोकॉल पुन्हा एकदा लागू होऊ शकतो.

हेही वाचा: UP elections : निवडणूक आयोगाची कारवाई, पोलीस निरीक्षक निलंबित

अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, लोकसभा सचिवालयाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा केली आहे. लोकसभेचे आठवे अधिवेशन ३१ जानेवारी २०२२ पासून सुरू होणार आहे. 8 एप्रिल रोजी त्याची सांगता होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद 31 जानेवारीच्या सकाळी संसदेच्या दोन्ही सभागृहांना (लोकसभा आणि राज्यसभा) एकाच वेळी संबोधित करतील, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. याशिवाय 1 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

हेही वाचा: लॉकडाऊनमध्ये विजेच्या निर्मितीसाठी राज्यावर २ हजार कोटींचे कर्ज

Web Title: Budget Session 2022 More Than 700 Employees Of Parliament Are Corona Positive Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top