दुसऱ्या आठवड्याची सुरवात ‘सुपरफास्ट’; एका दिवसात 7 विधेयकांना मंजुरी

loksabha_
loksabha_

नवी दिल्ली- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उत्तरार्धातील दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीचे कामकाज सोमवारी सुरळीत चालले. पहिल्या आठवड्यात गोंधळामुळे वाया गेलेल्या वेळेची भरपाई करण्याच्या जिद्दीनेच सरकारने सोमवारी दोन्ही सभागृहांचे कामकाज निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ चालविले. पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे हे अधिवेशन निर्धारित ८ एप्रिलऐवजी २५ किंवा २६ मार्चलाच गुंडाळले जाईल अशी चिन्हे आहेत. सर्वपक्षीय खासदारांनी मुख्य कामकाज पूर्ण झाल्यावर आम्हाला प्रचारासाठी जाऊ द्या, अशी जोरदार मागणी आहे. शेतकरी कायद्यांना विरोध म्हणून काँग्रेससह विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेत पहिल्या आठवड्यात झालेल्या अल्प कामकाजाची भरपाई करण्याच्या इराद्यानेच सरकारने सोमवारी ७ विधेयके दोन्ही सभागृहांत सादर किंवा मंजूर केली. 

सोमवारी सादर- मंजूर विधेयके  ः विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ वरून ७४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्याची तरतूद असलेले विमा (दुरुस्ती) विधेयक २०२१. बालकांवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा करण्याचे अधिकार न्यायालयाबरोबरच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देणारे बाल न्याय (संरक्षण व काळजी) दुरुस्ती विधेयक २१. दिल्ली राष्ट्रीय राजधानी सरकार कायदादुरूस्ती विधेयक २१. खाणी व खनिज ( विकास व नियमन) कायदादुरूस्ती विधेयक २१. राष्ट्रीय औषध शिक्षण व संशोधन (दुरुस्ती) विधेयक २१, नौदल गस्तीपथक मदत विधेयक २०२१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com