#Budget2018 जेटली उवाच....रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी बडोद्यात प्रशिक्षित कर्मचारी तयार करण्याचे काम सुरु. विमानतळांची संख्या 5 टक्क्यांनी वाढवणार, 900 नव्या विमानांची खरेदी करणार

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) संसदेमध्ये अर्थसंकल्प मांदला. यावेळी रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गांचे जाळे अधिकाधिक विकसित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले. 

जेटली म्हणाले -

 • भारतमाला योजनेंतर्गत 9 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे लक्ष्य
 • सर्व ट्रेनमध्ये वायफाय आणि सीसीटीव्हीची सुविधा 
 • रेल्वेच्या विकासासाठी 1 लाख 48 हजार 528 कोटी रुपयांची तरतूद
 • 4 हजार किमी रेल्वेमार्गांचे इलेक्ट्रिफिकेशन करणार
 • 18 हजार किलोमीटर रेल्वेमार्गांचे दुहेरीकरण करणार 
 • देशातील 600 रेल्वेस्थानके अत्याधुनिक करणार
 • राष्ट्रीय रेल्वे सुरक्षा कवच योजनेंतर्गत प्रवाशांच्या संरक्षणावर भर 
 • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी बडोद्यात प्रशिक्षित कर्मचारी तयार करण्याचे काम सुरु
 • विमानतळांची संख्या 5 टक्क्यांनी वाढवणार, 900 नव्या विमानांची खरेदी करणार
 • सध्या 124 विमानतळे सेवेत, कनेक्टिविटी वाढविण्यासाठी उडान योजनेला भर
 • विमानतळांची संख्या वाढली तर सुविधा पुरविण्यावर भर
 • बुलेट ट्रेनसाठी वडोदरा येथे रेल्वे विद्यापाठ सुरु करणार 
Web Title: #Budget2018 Arun Jaitley infrastucture roads railway